No Result
View All Result
- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे.
- संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते.
- संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा.
- मागील वर्षी १ मे रोजी लॉकडाऊन होता.
- यावर्षी देखील काही वेगळी परिस्थिती नाही.
- हाही काळ जाईल आणि आपण हा सुवर्ण दिवस सोन्याच्या झळाळीने साजरा करु.
- सध्या लॉकडाऊन सदृश स्थिती आहे.
- कालच उच्च न्यायालयाने आत्ता असलेल्या निर्बंधांपेक्षा कडक निर्बंध लादण्याची गरज आहे का असं विचारलंय.
- महाष्ट्रातील नागरीक नियम पाळतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- रुग्णवाढ कमी झालीय असं नाही, पण ज्या वेगाने वाढत होती ती आता स्थिरावली आहे.
- बंधनं लावणं सोपं आहे, पण पाळणं अवघड आहे.
- आपली रोजी मंदावेल पण मी रोटी थांबू देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- आपण संयम दाखवला आणि मी काही निर्बंध लादले.
- जी रुग्णवाढ साडेनऊ लाखांपर्यंत जाऊ शकली असती ती आपण साडेचार पाच लाखांपर्यंत रोखली आहे.
- राज्यासाठी गरजेच असेल तर कुणाचही अनुकरण करायला तयार आहे, मुख्मंत्री उद्धव ठाकरे
- लॉकडाऊन लावलंय पण हातला लॉक लावून बसलेलो नाही.
- संयम दाखवला असता तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं.
- आज ३० एप्रिल २०२१ ला सध्या राज्याता ६०९ प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत.
- चाचण्या तीन लाखांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
- काही जंबो कोरोना सेंटर उभारले आहेत.
- राज्यात बेड्स वाढवले आहेत. जूनमध्ये ३ लाख ३६ हजार होते. आता ४ लाख ३१ हजार आहेत.
- राज्यात आयसीयू बेड्स ११८८२ होते आता २८९०० बेड्स आहेत.
- जूनमध्ये ३७४४ वेंटिलेटर्स होते. सध्या ११ हजार व्हेंटीलेटर्स आहेत.
- डॉक्टर,नर्सेस वाढवणे कठीण आहे.
- रुग्णांमध्ये वाढ झाली तरमात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता
- सध्या रेमडेसिविरची मागणी वाढली आहे.
- ५० हजार इंजेक्शनची गरज आहे.
- केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिविरच्या वाटपाचं नियोजन स्वत:कडे घेतलं आहे.
- सुरुवातीला केंद्राने २६ हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती.
- मागणी केल्यानंतर आता केंद्राने ४३ हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केलं.
- सध्या ३५ हजाराच्या आसपास रोज इंजेक्शन मिळत आहेत.
- गरज असेल तर रेमडेसिविरचा वापर करावा.
- जिल्हा, तालुक्यात रुग्णालयात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची निर्मिती करण्याचे सांगितले आहे.
- कोरोनाची तिसरी लाट आली तर ऑक्सिनज कमी पडणार नाही.
- लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करणे सोपे असते.
- गॅस ऑक्सिजनची वाहतूक करणे अवघड आहे.
- गॅस ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी आपण कोरोना सेंटर्स उभारणार आहोत.
- दररोज पन्नास हजार रेमडिसिविरर आपल्याला लागतात.
- ऑक्सिजनला रुग्णाजवळ नेता येत नसेल तर रुग्णाला ऑक्सिजन प्लांटजवळ नेतो
- रोज जवळपास तीन लाखाच्या आसपास टेस्ट करतो
- कोरोना सेंटरचं ऑडिट करायला सांगितलं आहे
- १००० बेड्सची व्यवस्था करत आहेत.
- २७५ ऑक्सिजन प्लांट उभारत आहोत.
- ६० ते ७० टक्के आरटीपीसीआर टेस्ट आहेत.
- उरलेल्या अँटिजन टेस्ट आहेत.
- तिसरी लाट येणार असं तज्ज्ञ सांगतायत.
- तिसऱ्या लाटेचे घातक परिणाम महाराष्ट्रावर होऊ देणार नाही.
- उद्योजकांना तिसऱ्या लाटेच्या तयारी करायला सांगितलं आहे.
- काही जण लॉकडाऊनला विरोध करत होते, मात्र लॉकडाऊन लावलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती?
- काही ठिकाणी नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला. विरारमध्येसुद्धा आग लागली. यामध्ये जीवाची पर्वा न करता काम करणारे डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी हताश होतात.
- नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते. परभणीमध्येसुद्धा एक अकल्पीत घटना झाली.
- पावसाळा सुरु होणार आहे त्यामुळे ऑडिट करण्याचे सांगितले आहे.
- दुर्घटना टाळण्यासाठी जे जे करता येईल ते करतो आहोत.
- निर्बंधाच्या काळात सुमारे साडे पाज हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.
- शिभोजन थाळी मोफत दिली जाते.
- आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ भेटला आहे.
- सध्या ८९० शिवभोजन केंद्र सुरु झाले आहेत.
- ७ कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे.
- ६ कोटी नागरीकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी आहे.
- केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या.
- महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे.
- कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू.
- राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण.
- देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे.
- दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत.
- १२ कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे.
- उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय.
- कोविन अॅप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार.
- मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली अॅपची परवानगी द्या, ते अॅप केंद्राशी कनेक्ट करा.
- अॅपवर नोंदणी करुन, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा.
- महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे.
- साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल.
- लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये.
- उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही.
- माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे.
- आपली पूर्ण तयारी झाली आहे.
- सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका
- लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल.
- आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत.
- त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत.
- आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे.
- आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे.
- आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु.
- जी मदत जाहीर केली त्याची अंमलबजावणी करत आहोत.
- कामगार वर्गाच्या युनियन लिटरशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे.
- मला खात्री आहे. तिसरी लाट थोवण्यात यश येणार याची खात्री आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!