मुक्तपीठ टीम
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत कधी काय बोलेल हे तीही सांगू शकत नाही. तीचं वाट्टेल ते आणि वाट्टेल तसं बोलणं असो वा फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच चर्चेत राहण्याच्या प्रयत्नात दिसते. आता ती चर्चेत आली आहे. ती तिला कंगना राणौत विषयी विचारलेल्या प्रश्नावर तिने थेट कंगनावर निशाणा साधत दिलेल्या सल्ल्यामुळे.
राखीने कंगनाला या संकट काळात देशाची मदत करण्याचा सल्ला दिला आहे. राखीचा कंगनाला सल्ला देतानाचा व्हिडीओ विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून तो व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
व्हिडीओत काय?
- विरल भयानींनी इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या राखी सावंतचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
- या व्हिडीओत राखी आपल्या लाल कारमधून तोंडावर दोन मास्क, हातात सॅनिटायझर स्प्रे घेऊन उतरताना पाहायला मिळत आहे.
- तसेच मीडियाच्या लोकांना दूरुनच बोलण्याची सूचना देताना दिसते.
- कोरोनाच्या संकटकाळात आपल्या चाहत्यांना आणि देशातील नागरिकांना दोन मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सातत्याने करण्याचे आवाहन तिने केले आहे.
कंगनाला काय दिला सल्ला?
- याच दरम्यान, एकाने तिला प्रश्न विचाराला की, कंगना राणौत बोलत आहेत की देशाची परिस्थिती वाईट आहे, मोदीजी योग्य काम करत आहेत. पण देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यावर तुमची प्रतिक्रिया काय?
- या प्रश्नाला उत्तर देताना राखी म्हणाली की, “नाही मिळत आहे का? अरे कंगनाजी, कृपया देशाची सेवा करा. तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत, ऑक्सिजन विकत घ्या आणि गरजूंमध्ये वाटप करा, आम्ही तर हेच करतो आहोत”.