Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपाचा ४९८ कोटींचा जलद खर्च, ३२ शाळांचे काम मात्र संथच!

April 12, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bmc

मुक्तपीठ टीम

 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ४९८ कोटी खर्च करून ३२ शाळांना नवीन झळाळी देण्यासाठी वर्ष २०१८ पासून सुरु केलेली कामं संथगतीने सुरु असून क्षुल्लक दंड आकारल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस देण्यात आली आहे. वर्ष २०२० मध्येच ३२ पैकी १६ शाळांची काम पूर्ण करण्याची निश्चित केलेली वेळ संपली असून वर्ष २०२१ मध्ये १० शाळांची हवी तशी प्रगती दिसत नाही.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षाकडे मुंबईत सुरु असलेल्या शाळांच्या विकास कामाची माहिती मागितली होती. अनिल गलगली यांस ७ जन माहिती अधिकारी वर्गाने माहिती उपलब्ध केली असून माहितीच्या आधारे असे लक्षात येते की पालिकेने ३२ शाळेसाठी ४९८ कोटी रुपयांचे काम जारी केले आहेत. ३२ पैकी ७ शाळा नवीन जागेवर बांधल्या जात असून २ एल, २ के पूर्व, १ जी उत्तर, १ आर मध्य आणि १ आर दक्षिण या वॉर्डात आहेत. सर्वाधिक ८ शाळेचे काम कुर्ला एल वॉर्डात सुरु आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे लक्षात येते की ३२ पैकी १० कामे वर्ष २०२० मध्ये पूर्ण करणे गरजेचे होते. १६ कामे ही वर्ष २०२१ मध्ये पूर्ण करण्यात येणार असून यापैकी ६ कामांची मुदत संपली आहे. वर्ष २०२२ मध्ये ५ तर वर्ष २०२३ मध्ये १ काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

 

कुर्ला एल वॉर्डात ८ कामांवर १११.५ कोटी खर्च करण्यात येत आहे. एन वॉर्डात ११.८४ कोटी खर्च होत आहे. एम पूर्वेला ३ कामांवर ४३.२९ कोटी तर एम पश्चिमेला २ कामांवर ४१.२४ कोटी खर्च करण्यात येत आहे. जी दक्षिण येथील एका कामांवर ८.८४ कोटी, एफ उत्तर येथील २ कामांवर ५०.३१ कोटी, जी उत्तर येथील एका कामांवर २.७७ कोटी, के पूर्व येथील २ कामांवर १६.८४ कोटी, एच पूर्व येथील एका कामांवर १७.३६ कोटी, टी वॉर्ड येथील एका कामांवर २३.१८ कोटी, के पश्चिम वॉर्डातील २ कामांवर ३४.०१ कोटी, पी उत्तर येथील ३ कामांवर ३९.२२ कोटी, आर उत्तर येथील एका कामांवर 14.44 कोटी, आर मध्य येथील २ कामांवर ४२.१४ कोटी आणि आर दक्षिण वॉर्डातील २ कामांवर ४०.९० कोटी रुपये खर्च होत आहे.

 

दंड आकारण्यात कंजूसी

कंत्राटदार यांच्यावर प्रशासन मेहरबान असून दंड आकारण्यात कंजूसी होत आहे. एन वॉर्ड अंतर्गत एकच काम असून ६० हजार रुपये दंड आकारला आहे. जी दक्षिण वॉर्डात ३५ हजार रुपये, एफ उत्तर येथे ७५ हजार रुपये, जी उत्तर येथे २५ हजार रुपये, एम पूर्व येथे ८७,५०० रुपये, के पूर्व येथे १.०७ लाख रुपये, के पश्चिम येथे ८४ हजार रुपये, पी उत्तर येथे १.८९ लाख रुपये, आर मध्य येथे ४३ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

अनिल गलगली यांच्या मते जवळपास ५०० कोटींचे काम सुरु असून शाळा पायाभूत कक्षाकडे सर्व अधिकार असल्याने स्थानिक पातळीवर कामांची गुणवत्ता तपासली जात नाही. सर्व कामात उशीर झाला असून पालिकेतर्फे त्रयस्थ व्यक्तीकडून ऑडिट करणे आवश्यक आहे जेणेकरून सिव्हिल असो इलेक्ट्रिक कामाची गुणवत्ता तपासली जाईल, अशी मागणी अनिल गलगली यांनी पालिका आयुक्त यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे.


Tags: BMCBMC schoolआरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलीबृहन्मुंबई महानगरपालिकामुंबई
Previous Post

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊनची शक्यता, सामान्यांना तयारीसाठी वेळ मिळणार

Next Post

“प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!”

Next Post
jitendra & modi

"प्रजेला मूर्ख बनवता येते तेव्हा राजा पराभवाचाही आनंदोत्सव साजरा करतो!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!