मुक्तपीठ टीम
माणसाने कितीही प्रगती केली तरी काही बाबतीत मात्र आपण खूपच मागासलेले आहोत असं वाटतं. आता पाहा, माणसाने चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं त्याला पन्नास पेक्षा जास्त वर्षे उलटली. पण अद्याप एकही अश्वेत आणि महिला अंतराळवीर चंद्रावर गेलेले नाहीत. त्यामुळेच अमेरिकेची नवी अंतराळ मोहीम आर्टेमिस हा चांगली बातमी आहे.
नासा आर्टेमिस या नव्या अंतराळ मोहिमेंतर्गत प्रथमच अश्वेत आणि महिला अंतराळवीरांना पहिल्यांदा चंद्रावर पाठवणार आहे. अमेरिकतेली नव्या बायडेन-हॅरिस प्रशासनने घेतलेला हा निर्णय चंद्रावर ठेवलेल्या माणसाच्या पहिल्या पावलासारखंच मोठा इतिहास घडवणारं मानलं जातंय.
अमेरिकन काँग्रेस सभागृहासमोर बायडेन प्रशासनाने प्रस्ताव खर्च मंजुरीसाठी सादर केला. २३ अब्ज डॉलर्सच्या या खर्चाचा प्रस्ताव मांडताना नासाचे प्रशासक स्टीव्ह जर्कजीक म्हणाले, “सर्वांसाठी समतेची कल्पना पुढे नेण्याच्या अध्यक्ष बायडेन यांच्या वचनबद्धतेस ही मोहीम अधोरेखित करते.” आर्टेमिस अंतराळ मोहिमेसाठी अंतराळवीरांच्या पहिल्या चमूची घोषणा डिसेंबरमध्ये झाली. आर्टेमिस तीनसाठी पहिल्या क्रू दलातील दोन सदस्यांची घोषणा २०२४ मध्ये जाहीर केली जाईल.
पाहा व्हिडीओ: