Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युद्धात लढणार रोबोट डॉग, फ्रेंच सैनिकांद्वारे चाचणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
robot dog

मुक्तपीठ टीम

युद्ध म्हटले की हानी ठरलेलीच. मग ती जीविताची असो वा मालमत्तेची. त्यातही मालमत्तेची भरूनही येऊ शकते, जीविताची हानी ही कधीही भरून न येणारी. फ्रान्सचे सैन्य लवकरच आपल्या रोबोट डॉगसह युद्धासाठी उतरणार आहे. सध्या फ्रान्स सैन्याद्वारे या रोबोट डॉगची चाचणी घेण्यात येत आहे. सैन्याने रोबोट डॉगची चाचणी रात्री आणि दिवसा आपल्या सरावासाठी केली. सुरुवातीच्या तपासणीत ते बर्‍यापैकी फायदेशीर असल्याचे सिद्ध होत आहे.

 

स्पॉट नावाचा हा रोबोट डॉग अमेरिकेची कंपनी बोस्टन डायनेमिक्सने तयार केला असून ती गुगलच्या मालकीची आहे. यात कॅमेरे आहेत आणि त्याला रिमोट कंट्रोलद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते. विशेष गोष्ट म्हणजे त्याचे डिझाइन, जे इतर रोबोट्सपेक्षा चांगले आहे. याला कुत्र्यांसारखे ४ पाय आहेत, ज्यामुळे ते चाक किंवा इतर प्रकारच्या रोबोटमुळे होणाऱ्या अडथळ्यांना सहज पार करू शकते. त्यात चांगले संतुलन आहे आणि खड्डे असलेल्या ठिकाणी देखील सहजतेने धावू शकतो.

 

चाचणी केलेल्या अहवालानुसार या रोबोट डॉगने सैनिकांची गती थोडी कमी केली, परंतु यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यास मदत झाली. याशिवाय त्याची बॅटरी डाऊन होण्याची समस्याही समोर आली. पण नंतर सैनिक म्हणाले की, जिथे आम्ही रोबोटचा वापर केला नाही तिथे गोळ्या झाडल्या. जिथे रोबोट डॉग सोबत चालला होता, तिथे लक्ष्य ठेवल्याशिवाय आम्ही आमची मोहीम पूर्ण करण्यास सक्षम होतो.

 

सध्या याचा वापर केवळ युद्ध क्षेत्राच्या नेव्हिगेशनसाठी केला आहे आणि तो बांधकाम साइट्स, खाणी, कारखाने आणि भूमिगत सर्वेक्षणात उपयुक्त ठरला आहे. पण येत्या काही वर्षांत याचा सैन्य, पोलीस, संरक्षण, शोधमोहीम इत्यादी भागात मोठ्या प्रमाणात वापर सुरू होईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: muktpeethrobot dog
Previous Post

चंद्रावर जाणार पहिली महिला आणि अश्वेत अंतराळवीर

Next Post

या वर्षी आणखी पाच लसी, मेड इन इंडिया ओरल लसही!

Next Post
vaccine

या वर्षी आणखी पाच लसी, मेड इन इंडिया ओरल लसही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!