मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअपने आपली नवीन पॉलीसी आणली आहे. यासाठी व्हॉट्सअप वापरकर्त्यांना एक नोटिफिकेशन पाठवत आहे. हे नोटिफिकेशन स्वीकारले नाही तर आपले अकाऊंट डीलिट होऊ शकते असे सांगितले गेले आहे. त्यामुळे व्हॉट्सअपने दिलेल्या नियम व अटी मान्य करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय वापरकर्त्यांकडे नाही. त्यामुळे व्हॉट्सअपचा वापर करणाऱ्यांमध्ये घबराट माजली आहे. त्याचवेळी टेलीग्राम हे व्हॉट्सअपपेक्षाही पुढील दर्जाची सेवा पुरवणाऱ्या दुसऱ्या मॅसेजिंग अॅप्सची चर्चा जोरात सुरु झाली आहे. टेलीग्राम समाजमाध्यमातही ट्रेंडिंगला आलं. सिग्नल या दुसऱ्या मॅसेजिंग अॅपनेही आपलं नाव ट्रेडिंगला आणलं. दोन्ही अॅपचे वापरकर्ते व्हॉट्सअॅपपेक्षा जास्त सुरक्षित आणि खाजगी जीवन जपण्याची हमी आहे, असं बजावत आहेत.
फेसबुकची कंपनी असलेले मासेजिंग ऍप व्हॉट्सअपने आपली प्रायव्हसी पॉलिसी बदलली आहे. याचे नोटिफिकेशन व्हॉट्सअप सगळ्यांना पाठवित आहे. ही नवीन पॉलिसी मान्य करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची वेळ दिली आहे. पॉलिसी मान्य न केल्यास अकाऊंट डिलीट केले जाईल.
पॉलिसी मान्य करायची सोडून व्हॉट्सअपने अजून कोणताही पर्याय वापरकर्त्यांना दिला नाही सध्या यामध्ये नॉट नाऊ असा ऑपशन दिसत आहे. थोड्या वेळेसाठी जरी हे नोटिफिकेशन मान्य केले तरी तुमचे अकाऊंट चालू राहील. नवीन पॉलिसीत फेसबुक आणि इन्स्टग्राम चे एकत्रीकरण जास्त आहे. आधीच्या तुलनेत आता वापरकर्त्यांची जास्त माहिती फेसबूक कडे राहील. कंपनीने स्पष्ट केले आहे की फेसबुक सोबत व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामचे एकत्रीकरण जास्त राहील.
व्हॉट्सअपच्या अपडेट पॉलिसीत काही गोष्टी लिहिल्या आहेत.
यात लिहिले की, आमच्या सर्विसला ऑपरेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपला जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोर, सेंड किंवा रिसिव्ह करत आहात त्याचा वापर रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स देत आहे. तसेच यात लिहिले आहे की, या लायसन्समध्ये तुम्हाला देण्यात आलेला अधिकार आमच्या सेवेसाठी संचालन आणि उपलब्ध करण्यासाठी समित उद्देशसाठी आहे.
टेलीग्राम झाले ट्रेंडिंग
एकीकडे व्हॉट्सअप खूपच कडक धोरण स्वीकारत असताना ती खाजगी जीवनातील ढवळाढवळ मानून वापरकर्ते दूर होण्याची शक्यता आहे. आज समाजमाध्यमांमध्ये #Telegram हे प्रतिस्पर्धी अॅप ट्रेडिंग झाले. तसाच प्रयत्न सिग्नल अॅपकडूनही झाला. तेही ट्रेंडिंगला आणलं गेलं.
तर त्याचवेळी काहींनी तर चेष्टाही सुरु केली.

New update on privacy policy of WhatsApp be like…#WhatsappPrivacy #Telegram #WhatsappNewPolicy pic.twitter.com/QJUAotFhpe
— Zarnain (@Zarnain38710217) January 8, 2021