मुक्तपीठ टीम
गुजरातमधील आयआयटी गांधीनगरमधील ९०० विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर कर्मचार्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यातील धक्कादायक आणि आक्षेर्पाह भाग असा की लस घेणाऱ्यांपैकी बहुतेकांचे वय हे ४५ वर्षापेक्षा कमी आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्ये, उद्योगपती, सेलिब्रिटी मागणी करत असूनही केंद्राने ती मागणी फेटाळली असताना गुजरातमध्ये कमी वयोगटात एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण कसे झाले, हा वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
जे घडलं ते असं होतं…
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार लसीकरणाचा गुजरातमधील लस वय घोटाळा पुढील प्रमाणे झाला:
• गांधीनगरमधील आयआयटीला गांधीनगर महानगरपालिकेने कोव्हिशिल्डची लस पुरविली.
• अशा प्रकारे शैक्षणिक किंवा अन्य संस्थांना कोरोना लस कशी पुरवली जाऊ शकते का, हा पहिला वादाचा मुद्दा झाला आहे.
• विद्यार्थ्यांना एक ईमेल आला की आपल्याला ३० मार्च ते २ एप्रिल दरम्यान लस देण्यात येणार आहे.
• त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली.
• ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत आयआयटीमध्ये कोरोना लसीकरण करण्यात आले.
• ठरलेल्या कालावधीत त्या सर्वांना लसीचे पहिले डोस देण्यात आले.
• आयआयटी कॅम्पसमधील लसीकरण केंद्रात शिक्षक, विद्यार्थी आणि इतरांसह ९०० जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
• कॅम्पसबाहेरील विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत गांधीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी, गुजरातच्या आरोग्य सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.