मुक्तपीठ टीम
“गो करोना गो करोना” असे म्हणून कोरोना जाणार नाही. राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्वाचे आहे, तसेच खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा, असे मत सरळस्पष्ट शब्दात खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.
मलाच कळायचं बंद झालंय…
राज्यातील राजकारणात सध्या उठलेल्या वावटळीवरही त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून, मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे. ही तर सुरुवात आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तेव्हा कळेल राजकारण कुठं चाललंय,” असे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत सुनावले आहे.
राज्य सरकारलाही जनतेची काळजी!
• गो करोना गो करोना असे म्हणून करोना जाणार नाही. त्यामुळे शासनाने लावलेल्या निर्बंधांबाबत योग्य तो पुनर्विचार करावा.
• सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी.
• राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे.
• त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे.
• त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत.
• मात्र, आरोग्य महत्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा.
• त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत.
• जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला.
• या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले.
• त्यामुळे लोकांनी न भिता संसर्गाचा सामना करावा.”
शरद पवारांना का भेटले?
“शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मी भेटलो. या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही.”