Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव

तुषार गांधींनी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत मांडले विचार

April 8, 2021
in सरकारी बातम्या
0
tushar gandi

मुक्तपीठ टीम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नैतृत्वात स्वातंत्र्य चळवळतील विविध महत्वाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या. राज्यातील थोर पुरुषांचा व संतांचा त्यांच्यावर प्रभाव होता तसाच महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रातील पुरोगामी नेतृत्वावर आहे, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू तथा ख्यातनाम विचारवंत तुषार गांधी यांनी मांडले आहे.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे २० वे पुष्प गुंफताना “महाराष्ट्र आणि महात्मा गांधी ” या विषयावर तुषार गांधी बोलत होते.

महात्मा गांधी यांनी मॅट्रीकचे शिक्षण मुंबईत पूर्ण केले व इंग्लडला बॅरिस्टरी करण्यासाठीही याच शहरातून ते परदेशात गेले. आपल्या वकिली व्यवसायाची सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली. पुढे वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातून स्वातंत्र्य लढयातील विविध आंदोलनांची आखणी झाली व अनेक रचनात्मक कार्ये घडली. गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरुच होते तसेच संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम आदी संताच्या विचारांचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. महात्मा गांधींच्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व करत राज्याला दिशा दिली, असे तुषार गांधी यांनी सागितले.

आफ्रिकेतून परत आल्यावर महात्मा गांधी यांचा जानेवारी १९१५ मध्ये ‘महानायक’ म्हणून मुंबईतच सत्कार झाला. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीचा श्रीगणेशा केला. चंपारण्यच्या प्रसिध्द सत्याग्रहानंतर गांधीजी गुजरातेतील साबरमती आश्रमात स्थायिक झाले पण याकाळातही महाराष्ट्रातून त्यांना सतत सहकार्य मिळत राहिले. विनोबा भावे,काकासाहेब कालेलकर, साने गुरुजी, दादा धर्माधिकारी आदी अनुयायी-सहकारी त्यांना महाराष्ट्रात मिळाले. मिठाच्या सत्याग्रहानंतर गांधीजींनी साबरमती आश्रम सेाडला व वर्धेतील सेवाग्राम आश्रमात स्थायिक झाले. येथूनच त्यांच्या रचनात्मक कार्यास सुरुवात झाली. या आश्रमातील वास्तव्यात गांधीजींच्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या व त्यांच्या कार्यप्रणालीत वाढलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राला पुरोगामी नैतृत्व दिले. गांधींजींच्या विचारांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा व तत्वज्ञान मिळाले असे तुषार गांधी यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढयासाठी देश-विदेशात फिरताना महात्मा गांधी मुंबईतूनच प्रयाण करायचे. तेव्हा त्यांचा मुक्काम गावदेवी भागातील मनिभवन येथील मित्राच्या घरी असायचा. महात्माजींच्या नैतृत्वातील भारतीय स्वातंत्र्य लढयाचे निर्णायक ‘भारत छोडो आंदोलन’ही मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून झाले.पुण्याच्या आगाखाँ पॅलेस आणि एरवडा तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते.

महात्मा गांधीजींच्या ऐतिहासिक दांडीमार्चमधील ८० स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा सहभाग होता. गांधीजी तुरुंगाला मंदीर तर तुरुंगवासाला तपश्चर्या मानत असत. काही अपवाद वगळता ब्रिटीशांनी गांधींजींना महाराष्ट्रातील तुरुंगातच ठेवले होते. तुरुंगातील वास्तव्यात त्यांनी संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम अशा महाराष्ट्रातील संतप्रभावळींच्या साहित्याचा अभ्यास केला. या संतांच्या विचारांचाही गांधीजींवर प्रभाव होता.त्यांच्या अश्रमाच्या प्रार्थनेत महाराष्ट्रातील संतांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते असे सांगून गांधीजी महाराष्ट्राकडून प्रेरित झाले व महाराष्ट्राने गांधीजींच्या विचारातून प्रेरणा घेतल्याचे तुषार गांधी म्हणाले.

महात्मा फुले, छत्रपती शाहू, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदि महामानवांनी महाराष्ट्राला प्रेम ,आदर आणि शांतीचा संदेश दिला आहे त्याचे कायम स्मरण ठेवून आचरण व्हावे, अशा भावनाही तुषार गांधी यांनी व्यक्त केल्या .

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi


Tags: छत्रपती शाहूडॉ. बाबासाहेब आंबेडकरतुषार गांधीमहात्मा गांधीमहात्मा फुलेमहाराष्ट्र आणि महात्मा गांधीमहाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
Previous Post

सरकारलाही जनतेची काळजी, पण आरोग्याबरोबरच खाण्याचाही विचार करा!

Next Post

सरसकट लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे: नाना पटोले

Next Post
nana patole

सरसकट लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे: नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!