Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तब्बल ११ वर्षांनी रोहित-गिलच्या जोडीने केला हा पराक्रम

January 8, 2021
in मस्तच
0
शुबमन गिल

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेरीस भारताने २ बाद ९६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने अनुभवी खेळाडुंच्या जबरदस्त खेळीने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारताला चांगली सुरुवात मिळवून दिली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर हे दोघे माघारी परतले. मात्र, या जोडीने एक पराक्रम आपल्या नावी केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील रोहित शर्माचा हा पहिला सामना असून तो शुबमन गिलसोबत मैदानात उतरला होता. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ खेळत होते. या दोघांनी २७ षटके एकत्र खेळली. भारतीय सलामीवीरांनी आशिया खंडाबाहेर कसोटी क्रिकेट खेळताना २० पेक्षा जास्त षटकं खेळण्याचा योग तब्बल ११ वर्षांनंतर जुळून आला. याआधी २०१० साली दक्षिण आफ्रिकेच्या सेंच्युरियन मैदानावर विरेंद्र सेहवाग-गौतम गंभीर जोडीने असा पराक्रम केला होता.

पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुबमन शिल या तीन सलामीवीरांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यात म्हणजे चार डावांत त्यांनी ८.५ षटके खेळली होती, तर रोहित-गिल या जोडीने पहिल्याच डावात २७ षटकांपर्यंत खेळपट्टीवर तग धरला.

दरम्यान, बचावात्मक फटका खेळताना रोहित जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ७७ चेंडूत ३ चौकार, १ षटकार लगावत २६ धावा केल्या. तर शुबमन गिलने १०१ चेंडूत ८ चौकारांसह त्यांने ५० धावा केल्या.

 


Tags: gautam gambhirIND VS AUSmuktpeethRohit sharmashubman gilltest cricketvirender sehwaगौतम गंभीररोहित शर्माविरेंद्र सेहवागशुबमन गिल
Previous Post

मालवणीतून एक वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

Next Post

मुंबईत पोलिसाला गोळ्या झाडून जिवे मारण्याची धमकी

Next Post
police constable

मुंबईत पोलिसाला गोळ्या झाडून जिवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!