Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मालवणीतून एक वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

अपहरण झालेल्या मुलीची सुटका; मुलीचा ताबा पालकांकडे

January 8, 2021
in कायदा-पोलीस
0
Kidnapping

Strong male hands cover little girl face with emotional stress, pain, afraid, call for help, struggle, terrified expression.Concept Photo of abduction, missing, kidnapped,victim, hostage, abused child


दोन दिवसांपूर्वी मालवणी परिसरातून झालेल्या एका एक वर्षांच्या मुलीचे अपहरणाच्या गुन्ह्यांचा अवघ्या ४८ तासांत मालवणी पोलिसांनी छडा लावून अपहरण करणार्‍या २४ वर्षांच्या महिलेस ठाणे येथून अटक केली आहे. सफाला बिपीन नायक असे या महिलेचे नाव असून तिला शनिवारी बोरिवलीतील स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुलाची आवड असल्याने तिने या मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलीला घेऊन ती ओडीसाला जाणार होती, मात्र त्यापूर्वीच तिला पोलिसांनी अटक केली.

 

सफाला ही मूळची ओडिसाची रहिवाशी आहे. काही वर्षांपासून ती मुंबई शहरात घरकाम म्हणून काम करीत होती. तीन दिवसांपूर्वी ती मालाडच्या मालवणी परिसरात आली होती, तिथेच तिची ओडिसाची एक मैत्रिण राहते, तिच्याकडे काहीच काम नव्हते, त्यामुळे तिने तिच्याकडे राहण्याची विनंती केली होती, मात्र या मैत्रिणीने तिच्या परिचित तक्रारदारांकडे तिची दोन दिवस राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांनीही तिला त्यांच्या घरी ठेवून घेतले होते. ६ जानेवारीला रात्री साडेआठ वाजता ती त्यांच्या एक वर्षांच्या मुलीला घेऊन बाहेर गेली होती, आम्ही दोघेही फेरफटका मारुन येतो असे सांगून गेलेली सफाला ही बराच वेळ होऊन घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता, या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली होती.

 

सफालाकडे मोबाईल होता, तिने मोबाईलवरुन दोन ते तीन कॉल केले होते, त्यावरुन पोलिसांनी तिचे लोकेशन काढले, या लोकेशनवरुन ती ठाण्यात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन रजाणे, गुन्ह शाखेचे अधिकारी हसन मुलानी, अशोक लांडगे, सुधीर चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा खोसे, डॉ. दिपक हिंडे, पोलीस हवालदार तिवारी, कदम, चौधरी, पोलीस नाईक मगदुम, बुगडे, हिरेमठ, बडतकर, पोलीस शिपाई गोंजारी, मोरे, भुजबळ, शिंदे, भंडारे, नवले, शिंदे, उगले यांनी ठाणे येथील हिरानंदानी परिसरात सफाला नायक हिला शिताफीने अटक केली. तिच्या ताब्यातून पोलिसांनी या मुलीची सुटका करुन तिला नंतर तिच्या पालकांकडे सोपविले होते.

 

अटकेनंतर तिला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलीस ठाण्यात आणले, सध्या तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे, प्राथमिक तपासात सफाला ही विवाहीत असून तिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतला आहे, गेल्या तीन वर्षांपासून ती मोलकरीण तसेच लहान मुलांना सांभाळण्याचे काम करीत होती, तिला मुलांची आवड होती, ती नेहमीच मोबाईलवर लहान मुलांचे व्हिडीओ पाहत होती, तिला एका मुलाची गरज होती, त्यामुळे तिने या मुलीचे अपहरण केले होते, अपहरणानंतर ती ठाणे रेल्वे स्थानकात ओडीसाला जाण्यासाठी आली होती, मात्र तिची ओडिसाला जाणारी ट्रेन निघून गेली होती, त्यामुळे तिने एका मराठी जोडप्याची मदत घेतली होती, एक दिवसांसाठी तिला व मुलीला आश्रय द्या असे तिने त्यांना सांगितले होते, त्यानंतर ते जोडपे तिला तिच्या हिरानंदानी येथील घरी घेऊन गेले होते. तिथेच तिला नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.


Tags: kKidnappingmalavani policemuktpeethअपहरणमालवणी पोलिसमुक्तपीठ
Previous Post

सावंतवाडी रेल्वे स्थानकास मधू दंडवते रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याची मागणी

Next Post

तब्बल ११ वर्षांनी रोहित-गिलच्या जोडीने केला हा पराक्रम

Next Post
शुबमन गिल

तब्बल ११ वर्षांनी रोहित-गिलच्या जोडीने केला हा पराक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!