मुक्तपीठ टीम
अॅमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनेही मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावरुन अॅमेझॉनला मनसेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. तो संघर्ष ताजा असताना आता फ्लिपकार्टनेही आपल्या ग्राहकांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
लिंक क्लिक करा पाहा व्हिडीओ
कंपनीच्या म्हणण्यानुसार, मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करणे हे विशेष अर्थाने महत्त्वपूर्ण आहे कारण, मराठी ही भारतातील तिसऱ्या क्रमांची बोली भाषा आहे. २०२१ च्या अखेरपर्यंत भारतातील इंटरनेट वापरणारे ७५ टक्के मराठी हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांचा वापर करणारे असतील. फ्लिपकार्टचे जास्त वापरकर्ते हे लहान शहरातून आहेत.
ऑक्टोबर महिन्यात मनसेने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने मराठीत अॅप आणलं नाही तर त्यांची दिवाळी मनसे स्टाइल साजरी होईल असा इशारा दिला होता. त्यानंतर फ्लिपकार्टने महत्त्वाचं आश्वासन दिलं होतं. कंपनीच्या अॅपमध्ये भाषा समाविष्ट करण्याच्या मागणीवरून मनसेने यापूर्वी ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ ही मोहीम सुरू केली होती.
फ्लिपकार्ट या बाजारपेठेने मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून आपल्या प्रादेशिक भाषेच्या सेवेला अधिक बळकटी दिली आहे. फ्लिपकार्ट अॅप आता इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ आणि तेलुगु अशा सहा महत्त्वाच्या भाषा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामुळे भारतीय ग्राहकांसाठी ई कॉमर्स अधिक सर्वसमावेशक सहज उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी फ्लिपकार्टने अधिक बळकट केली आहे.