मुक्तपीठ टीम
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये साखर कारखानदारांवर शेतकर्यांच्या थकबाकीत फेब्रुवारीपर्यंत १९.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, ही थकबाकी वाढून २२.९ हजार कोटी रुपये झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ती १९.२ हजार कोटी रुपये इतकी होती.
ही परिस्थिती का उद्भवली?
असोसिएशनचे म्हणणे आहे की, साखरेच्या दरात घट झाल्याने साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती
ढासळली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “साखर कारखान्यांच्या महसूल वसुलीत सुधारणा होणे आवश्यक आहे, अन्यथा जर ही परिस्थिती अधिक बिकट झाली तर ऊस उत्पादक शेतकर्यांची थकबाकी वेगाने वाढेल”.
मार्चपर्यंत सारख कारखान्यांचे उत्पादन २७.७५ मिलियन टन होता, जो मागील वर्षी २३.३१ मिलियन टन होता. देशात ऊसाचे सर्वात जास्त उत्पादन हे महाराष्ट्र राज्यात होते. हे उत्पादन सुरुवातीला ५.९ मिलियन टन असून आता १० मिलियन टनपर्यंत वाढले आहे. यानंतर उत्तर प्रदेशाचा आणि कर्नाटकचा नंबर लागतो. तर आसोसिएशनच्या म्हणण्यानुसार, २०२०-२१ वर्षात देशभरातील ऊसाचे उत्पादन ३०.२ मिलियन टन होऊ शकते,ते २०१९-२० या वर्षात २७.४२ मिलियन टन एवढे होते.