मुक्तपीठ टीम
कोरोना लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यात सरकारने ४५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा खाली आणल्याने लस घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे आणि त्याचबरोबर लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यायची त्याबद्दलचं कुतुहलही. त्यातील काही मुद्द्यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.
कोरोनाची लस घेतल्यानंतर काय करावं, काय टाळावं?
- डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर सौम्य प्रमाणात ताप येणे, स्नायू दुखणे ही सामान्य गोष्ट आहे. असे झाल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.
- कारण, या लक्षणांमुळे असे दिसून येते की, आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती लसला प्रतिसाद देत आहे. हे दुष्परिणाम काही दिवसातच दूर होतात.
- तसेच याव्यतिरिक्त इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना होणे, थकवा, डोकेदुखी, अतिसार यासारखे साइड इफेक्ट्स सामान्यपणे दिसून येतात.
लसीचे दीर्घकालीन दुष्परिणाम
- कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतर काही दिवस टॅटू काढू नये. जर काढायचेच आहे तर लस घेताना डॉक्टरांना या संबंधित विचारणा करा नाही तर काही दिवस थांबा.
- लसीकरणानंतर व्यायाम करणे टाळा. लसीकरणांमुळे आपल्या स्नायूंमध्ये वेदना होत असल्यास व्यायामाने त्या अधिक वाढतील. त्यामुळे लसीकरणानंतर एक किंवा दोन दिवसांचा ब्रेक जरुर घ्या.
- कोरोनाची लस घेण्याच्या दोन आठवड्यापूर्वी आणि त्यानंतर कोणतीही लस घेणे टाळा. कोरोना लस इतर लसींना कशी प्रतिसाद देते याबद्दल अद्याप फारशी माहिती नसल्याने काही आठवड्यांचे अंतर राखणे फायदेशीर ठरू शकते.
- लसीचा डोस घेतल्यानंतर मिळालेले प्रमाणपत्र जपून ठेवणे गरजेचे आहे. कारण ते प्रमाणपत्र बाहेर गावी फिरण्यास जाण्यासाठी किंवा विसासाठी उपयोगी पडू शकते.