मुक्तपीठ टीम
कोणालाही मूर्ख बनणे आवडत नाही. बनवणे मात्र आवडतं. त्यातही राजकारण्यांना तर त्यात जास्तच कसब प्राप्त झालेले असते, असे आपण मानतो. त्यांच्याशीही या दिवसाचा संबंध आहेच आहे. एक एप्रिल हा दिवस एप्रिल फूल दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण इतरांना मूर्ख बनवून गंमत करण्याचा प्रयत्न सर्वच करतात. आज एक एप्रिलच्या निमित्ताने मुर्खपणाच्या इतिहासाची माहिती:
एप्रिल फूलचा इतिहास
एप्रिल फूल दिवस फक्त भारतातच नव्हे तर जगभरात दरवर्षी साजरा केला जातो. बर्याच देशांमध्ये हा दिवसदेखील सुट्टीचा असतो. लोक या मजेचा आनंद घेतात..
चौदाव्या शतकापासून मुर्खपणाचा इतिहास
असे म्हटले जाते की पहिला एप्रिल फूल दिवस सन १३८१ मध्ये साजरा करण्यात आला. वास्तविक यामागे एक मजेशीर कथा आहे. इंग्लंडचा राजा रिचर्ड आणि बोहेमियाची राणी अॅनी यांनी त्यांच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. दिवस जाहीर केला तो ३२ मार्च १३८१ हा. लोक खूप आनंदित झाले आणि, त्यांनी उत्सव साजरा करण्यास सुरवात केली. पण नंतर त्यांच्या असे लक्षात आले की हा दिवस वर्षात कधीच येत नाही. राजा-राणीने आपल्याला मूर्ख बनवले. ३१ मार्चनंतर १ एप्रिल हा फूल दिन म्हणून साजरा करण्यास त्यांनी सुरवात केली
जगभरात ‘एप्रिल फूल’ची परंपरा
एप्रिल फूल दिन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमध्ये एप्रिल फूल दिन फक्त दुपारपर्यंत साजरा केला जातो. काही देशांमध्ये – जपान, रशिया, आयर्लंड, इटली आणि ब्राझील येथे, फूल डे संपूर्ण दिवस साजरा केला जातो.
अर्थात राजकारण्यांपासूनच मूर्खपणाच्या दिवसाची सुरुवात झाली असली तरी सध्या तसे करणे त्या राजाराणीसारखे निरागस राहिलेले नाही आणि एका दिवसापुरते मर्यादितही नाही!