मुक्तपीठ टीम
आज पाच दिवसानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती खाली आल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात २२ पैसे आणि डिझेलच्या दरात २३ पैशांपर्यंत कपात केली आहे. आज मंगळवारी मुंबईत पेट्रोलचा दर ९६.९८ रुपये आणि डिझेलचा दर ८८.०६ रुपये प्रतिलिटर झाली आहे. सध्या पाच राज्यांमध्ये निवडणुका असल्याने इंधन कंपन्या दरवाढ करत नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अशा निवडणुका कायम राहिल्या तर दरकपातीचा फायदाच मिळेल, अशा भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.
शहराचे नाव |
पेट्रोल रु |
डिझेल रु. / लि |
मुंबई | ९६.९८ | ८७.०६ |
चेन्नई | ९२.५८ | ८५.८८ |
कोलकत्ता | ९०.७७ | ८३.७५ |
दिल्ली | ९०.५६ | ८०.८७ |
पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होऊ शकतात
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमतींमध्ये वाढ झाली असली तरी देशांतर्गत बाजारपेठेत निवडणुकांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यात निवडणुका आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार निवडणूक कालावधीत दरम्यान होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.
अशी भडकते इंधन महागाई…
- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
- केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारचे व्हॅट काढून टाकल्यास डिझेल आणि पेट्रोलचे दर प्रतिलिटर २७ रुपये असेल, परंतु केंद्र किंवा राज्य सरकारला तसे करणे परवडू शकत नाही. कारण त्यांच्या महसुलाचा मोठा मोठा भाग येथूनच येतो. या पैशातून वाढ होते.