मुक्तपीठ टीम
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे २३ एप्रिलला निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नावं मागवण्यात आली होती. त्यानंतर सरन्यायाधीश बोबडे यांनी न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना यासंदर्भात पत्र पाठवलं होतं.
कोण आहेत एन.व्ही. रमण?
– २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातल्या पोन्नावरम गावात जन्म.
– शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला
– रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती
– १० फेब्रुवारी १९८३ पासून वकिलीला सुरूवात
– न्यायमूर्ती रमण यांचं B.Sc, B.L. झालं आहे.
– संविधान, फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये प्राविण्य