Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

March 19, 2021
in सरकारी बातम्या
0
campaign

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी मुंबई शहरास बाल कामगार बाल भिक्षेकरी, बालकांचे शोषण व रस्त्यावरील मुले या बालकांच्या समस्यांतून मुक्त करण्याबाबत अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘मुंबई आमची बाल मित्रांची’ या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते झाले.

प्रतिकुल परिस्थितीमध्ये, असुरक्षित, हरवलेली आणि सापडलेली अशा मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी मुंबई येथे मैत्रीपूर्ण ठिकाणे या अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहराला अशा मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाण बनविणे आहे, असे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.

ही मोहीम बाल कामगार, बालकांचे लैंगिक शोषण, भीक मागणे, असुरक्षित हरवलेली आणि सापडलेल्या मुलांसाठी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविणे व त्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या कामाची व्याप्ती वाढविणे यावर आधारित असल्याचे निवतकर यांनी सांगितले.

या अभियानाद्वारे मुंबई येथील पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, हाजी अली, सिध्दी विनायक मंदिर, सार्वजनिक उद्यान, रेल्वे स्टेशन, रस्ते त्या त्या विभागामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी अशी मैत्रीपूर्ण ठिकाणे बनविण्यात येतील जेथे त्यांचे आरोग्य, शिक्षण, पौष्टिक आहार, समुपदेशन यांची सर्वांगीण काळजी घेण्यात येईल, तसेच हरवलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेवून त्यांना पुन्हा पालकांच्या ताब्यात देवून पुनर्वसन करण्यात येईल. अशा प्रकारे बालकांच्या सर्व हक्काचे संवर्धन करण्याचे प्रयोजन आहे, असे जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.

या अभियानाअंतर्गत पुढील सहा महिन्यात सोशल मीडियाव्दारे याविषयी जागरूकता निर्माण करणे, आरोग्य शिबीर घेणे, रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे येथे बचावकार्य राबविणे, सामान्य लोकांच्या माहितीसाठी बूथ उभारणे, कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांसह बाल कल्याण समिती, पोलीस, वॉर्ड समित्या, नगरसेवक यांच्यासाठी प्रशिक्षण घेणे यांचा सामावेश आहे.

मुंबईमध्ये अशा प्रकारच्या मुलांसोबत काम करणाऱ्या सर्व संबंधितांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या कामामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई शहर, समाज सेवा शाखा, मुंबई पोलीस, बाल आशा ट्रस्ट, आय.जी.एम. प्रेरणा, विधायक भारती, प्रथम, चाईल्ड लाईन इ. स्वयंसेवी संस्थाचा सहभाग असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ही मोहिम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मुंबई शहर, प्रेमा घाटगे यांच्या अधिपत्याखाली सर्व संबंधित शासकीय विभाग व स्वयंसेवी संस्था यांचे समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

 

 


Tags: 'Mumbai Aamchi BalmitranchicampaignInaugurationmumbaiजिल्हाधिकारी राजीव निवतकरमुंबईमुंबई आमची बाल मित्रांची
Previous Post

“ई-ऑफीससह इतर सुविधांद्वारे नागरिकांना सेवा सुलभपणे मिळावी”

Next Post

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. पठाण दुसरे पुष्प गुंफणार

Next Post
Maharashtra

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. पठाण दुसरे पुष्प गुंफणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!