Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“ई-ऑफीससह इतर सुविधांद्वारे नागरिकांना सेवा सुलभपणे मिळावी”

माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांचे निर्देश

March 19, 2021
in सरकारी बातम्या
0
uddhav

मुक्तपीठ टीम

प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून पारदर्शकता व उत्तरदायित्व या आधारे सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागाने ई ऑफिस, नगरपालिका व महानगरपालिकांकडून आकारले जाणारे मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली, हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम व डाटा मानकीकरण हे नागरिकांना सुलभ प्रक्रियेद्वारे सेवा देणारे पाच पथदर्शी प्रकल्प येत्या सहा महिन्यात पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

सर्व विभागांनी ‘ई -ऑफिस’ प्रणालीचा अवलंब करावा यासाठी या प्रणालीची माहिती व महत्व सांगणारे प्रात्यक्षिक व सादरीकरण माहिती तंत्रज्ञान विभागाने सादरीकरण करावे. ई -ऑफिस मुळे पारदर्शकता व उत्तरदायित्व कसे येणार यासंदर्भात माहिती द्यावी. एक फाईल तयार करून त्याची हालचाल कशी होणार त्याचे प्रात्यक्षिक द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

ई -ऑफिसच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागाचे मंत्री व सचिव यांच्यासमोर प्रात्यक्षिक द्यावे. ज्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच प्रशिक्षण दिले आहे त्यांना घेऊन ते प्रात्यक्षिक देण्यात यावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रत्येक योजनेचे लाभार्थी कोण असतील, त्याचा प्रशासकीयदृष्ट्या तसेच सामान्य माणसांना कसा उपयोग होणार आहे याची माहिती एकत्रित करावी. हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन वैद्यकीय महाविद्यालयांची प्रायोगिक तत्त्वावर निवड करावी व पथदर्शी प्रकल्प राबवावा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील म्हणाले,प्रशासनात पारदर्शकता येण्यासाठी ई ऑफिस प्रणालीचा सर्वत्र वापर झाला पाहिजे. हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवआभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महा आयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद कोलते, अवर सचिव मुकेश सोमकुंवर आदी उपस्थित होते.


Tags: chief minister uddhav thackeraycm uddhav thackerayIT departmentमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी.पाटीलवर्षा बंगला
Previous Post

वाझे प्रकरणात गाड्याच गाड्या…आणखी दोन आलिशान गाड्या जप्त!

Next Post

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

Next Post
campaign

‘मुंबई आमची बालमित्रांची’ अभियानाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!