मुक्तपीठ टीम
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन यांची बहीण किम यो-जोंगने अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. किम यो जोंगने “अमेरिकेला ४ वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी उत्तर कोरियाला चिथावण्यासाठी दूर राहिलं पाहिजे”असा धमकीवजा इशाराही दिला आहे. अमेरिकेच्या जो बायडन प्रशासनावर किमची ही पहिली प्रतिक्रिया आहे.
अमेरिकेला का इशारा देण्यात आला ?
- दक्षिण कोरियाबरोबर संयुक्तपणे अमेरिकेचा युद्ध अभ्यास आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटॉइन ब्लींकेन आणि संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांची प्रस्तावित भेट हे उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकीवजा इशारा देण्याचे मुख्य कारण आहे.
- प्योंगयांगमधील सरकारचं अधिकृत वृत्तपत्र रोडोंग सिनमुन सोबत झालेल्या चर्चेत किम यो जोंग म्हणाल्या, “अमेरिकेच्या नव्या अध्यक्षांना आम्ही महत्त्वाचा सल्ला देतो. जो कुणी आमच्या जमिनीवर स्फोटकांचा दुर्गंध पसरवण्याचा प्रयत्न करेल त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. अमेरिकेला पुढील ४ वर्षे शांततेत झोपायचं असेल तर त्यांनी स्फोटकांपासून दूर राहणं हेच योग्य आहे.”
- तसेच अमेरिकेच्या या प्रयत्नांमुळे शांतता प्रस्थापित होणार नाही. आमचे दक्षिण कोरियाकडे लक्ष आहे. त्याच्याकडून जर चिथावणी देणारी कारवाई झाल्यास उत्तर कोरिया त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करू शकेल”.
- किम यो जोंग यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरियातील युद्ध अभ्यासाला हल्ल्याची तयारी म्हणून वर्णन केले. उत्तर कोरियामध्ये किम जोंग उन नंतर त्यांची बहीण सर्वात शक्तिशाली मानली जाते. त्यामुळे तिच्या धमकीवजा इशाऱ्याला गंभीरतेने घेतले जात आहे.
उत्तर आणि दक्षिण कोरियात जुनाच वाद
• उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध कायम तणावाचे असतात.
• या दोन्ही देशांमधील संबंध टिकवून ठेवण्यासाठी कित्येक पावले उचलली गेली पण काही उपयोग झाला नसून आजही या दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.
• गेल्या नोव्हेंबरमध्ये दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-उन यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशांमधील संबंध चांगले करण्यासाठी पावले उचलली होती. पण काहीच उपयोग झाला नाही.