मुक्तपीठ टीम
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके प्रकरणात एक मर्सिडिझ गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी
मनसुख हिरेन यांनी वापरली होती. पुढे तपासात ती गाडी सचिन वाझेंच्या वापरात होती, असा दावा एनआयएने केला. मात्र, त्या गाडीसोबत भाजपाच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्याचे छायाचित्र ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली. त्याचवेळी त्याच छायाचित्रात भाजपा पदाधिकाऱ्यासोबत दिसणारी दुसरी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा धुळ्यातील समर्थक असल्याचा दावा सावंत यांना प्रत्युत्तर देताना करण्यात आला. ती व्यक्तीच मर्सिडिझचे मालक असल्याचाही दावा करण्यात आला. मात्र, त्यांनी ती गाडी ऑनलाइन विकल्याचा दावा केला. त्यामुळे आता अंबानी स्फोटके प्रकरणातील मर्सिडिझचे गूढ वाढत चालले आहे.
दरम्यान, भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सदर गाडीच्या प्रकरणाचा तपास यंत्रणेने शोध घ्यावा, वस्तुस्थिती पुढे आणावी, अशी मागणी केली आहे. सचिन सावंत आणि नाना पटोले या प्रकरणात कुणाची दलाली करतात, असा सवालही त्यांनी केला.
Now BJP connection emerges – the Mercedes car allegedly used by Mansukh Hiren on 17th February is seen in a photograph of BJP office bearer of Thane.
Would @BJP4Maharashtra leaders give explanation? pic.twitter.com/w64FAyfDpi— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
अंबानी स्फोटके प्रकरणात स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पियो गाडीनंतर चर्चेत आली ती इनोव्हा गाडी. ती गाडी पोलिसांची असून वाझे यांनी स्फोटके ठेवणाऱ्या गाडीसोबत वापरल्याचा दावा एनआयएने केला. त्यानंतर तिसरी गाडी चर्चेत आली.
स्फोटके ठेवलेल्या स्कॉर्पियो गाडीचा मालक मनसुख हिरेनने एका मर्सिडिझमधून प्रवास केला होता. ती गाडी कुणाची, याचा शोध एनआयएने घेतला. तेव्हा या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांच्या वापरातील असल्याचे उघड झाल्याचा दावा एनआयएने केला. त्याचवेळी त्या मर्सिडिझशी भाजपाच्या ठाण्यातील एका नेत्याचे कनेक्शन असल्याचा दावा करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाकडे स्पष्टीकरण मागितले. आपल्या ट्विटमध्ये सावंत यांनी मर्सिडिझसोबत ठाण्यातील भाजपाचे पदाधिकारी असल्याचा दावा करत भावेन शेळके यांची भाजयुमोच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याचे पत्र आणि छायाचित्र जोडले होते.
BOOM
Does Mr Vaze’s Mercedes car which is being scanned by @NIA_India right now belongs to one Mr Saransh Bhavsar who is connected to NCP ?https://t.co/s13P8BH6ORhttps://t.co/uueThxeI24 pic.twitter.com/aVWbaqkn4k
— Suresh Nakhua ( सुरेश नाखुआ ) (@SureshNakhua) March 16, 2021
सचिन सावंत यांनी ट्विट केल्यानंतर पुढे त्यांनी जोडलेल्या छायाचित्रात भाजपा पदाधिकाऱ्यासोबत उभी असलेली व्यक्ती ही सारांश भावसार हे असल्याचे पुढे आले. सारांश भावसार हे धुळ्यातील व्यावसायिक आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक असल्याचा दावा सावंत यांना उत्तर देताना करण्यात आला. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी पोस्ट केलेल्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अनिल गोटे यांच्याबद्दलच्या पोस्ट जोडण्यात आल्या.
अरे सचिन .हा BMWचा मालक सर्वेष भावसर तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता निघाला.जर त्या गाडी सोबत फोटो काढणारा BJP चा आहे तर मालकच राष्ट्रवादीचा आहे..काय नमुने भरले आहे या सरकार मध्ये .महाराष्ट्रचा सत्यानाश केला या लोकांनी.जनतेच्या प्रश्नावर दुर्लक्ष्य पण स्वतः घोटाळे करण्यात वस्त्य pic.twitter.com/fA0VzKNfuh
— Kamravatkar (@Kamravatkar1) March 17, 2021
या सर्व वादात केंद्रस्थानी असलेल्या मर्सिडिझ नोंदणी क्रमांक एमएच १८ -बीआर – ९०९५ या गाडीचे मालक सारांश भावसारच असल्याचेही उघड झाले. सारांश भावसार यांनी माध्यमांशी बोलताना ती गाडी आपल्या मालकीची होती. मात्र, कार २४ या ऑनलाइन पोर्टल मार्फत ती विकल्याचा दावा केला. मात्र, ती कुणाला विकली गेली, तिचा नवा मालक कोण, ते मात्र त्यांनी सांगितले नाही. सध्या त्या गाडीशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत जर एनआयएने चौकशी केली तर आपण सर्व सहकार्य करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
देवेन शेळकेचा नाथाभाऊ सोबत फोटो आहे मग तुमच्या लॉजिक प्रमाणे नाथाभाऊ पण ह्यात सामील आहे? त्याचा भाऊ हा राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष आहे तसेच गाडीचा मालक अनिल गोटे समर्थक आहे. म्हणजे ह्यात सेनेचा नाहीतर राष्ट्रवादीचा हात आहे? pic.twitter.com/GfGPdyzxMu
— Abhishek | अभिषेक (@ABHIca92) March 17, 2021
त्यामुळे आधीच रहस्यमय असलेल्या अंबानी स्फोटके प्रकरणातील गूढ अधिकच वाढल्याचे दिसत आहे. नेमकी ती मर्सिडिझ विकल्यानंतर कुणाच्या मालकीची झाली, त्यांच्याकडून ती सचिन वाझेंकडे कशी आली, ते स्पष्ट झाल्यानंतरच बऱ्याच गोष्टींवर प्रकाश पडेल. तोपर्यंत वाझेंच्या वापरातील मर्सिडिझ आणि तिच्यासोबतचे वाझे राहत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्याचे राष्ट्रवादी समर्थक असल्याचा दावा झालेल्या मर्सिडिझच्या मूळ मालकासोबतच्या छायाचित्रामुळे निर्माण झालेले गूढ तसेच राहण्याची शक्यता आहे.