मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादणारी नियमावली जारी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जारी केलेल्या नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या संस्था नियमावलीचा भंग करतील त्यांच्या वास्तू कोरोना साथ संपेपर्यंत बंद राखण्यासारखी जरब बसवणारी पावलेही उचलली जाणार आहेत.
काय आहेत नवे निर्बंध?
- सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
- रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) आणि मॉल्स
- राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- पुढील नियम मॉलसाठीही लागू असतील
- आता मास्कशिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल.
- प्रत्येक अशा वास्तूत ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
- मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.
- जर नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर, मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
- लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असेल.
- जर अशा कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले तर कार्यक्रम आयोजित केलेल्या वास्तूच्या मालकांवर कारवाई केली जाईल. कोरोना महासाथ असेपर्यंत ती वास्तू बंद ठेवली जाईल.
- अत्यंसंस्कारात २० पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.
- सर्व कार्यालये (आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता) ५० टक्के उपस्थितीतच सुरु राहू शकतील. वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. जी कार्यालये नियमांचा भंग करतील त्यांच्याविरोधात कोरोना महासाथ असेपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याची कारवाई केली जाईल.
- धार्मिक स्थळी व्यवस्थापनाने जागेची क्षमता लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची दक्षता घेत प्रतितास प्रवेशाची संख्या निश्चित करायची आहे. ऑनलाइन रिझर्व्हेशनसारख्या मार्गाने प्रवेशाची व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेथे मास्कशिवाय प्रवेश नसेल. तापमान तपासणी, सॅनिटायझर्स आवश्यक असतील.
- मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.