मुक्तपीठ टीम
देशातसह महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, महाराष्ट्रात अजूनही काही नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे महत्व समजलेले नाही आहेत. राज्यात आजपर्यंत ९८ लाख नागरिकांनी लसीकरणाचा एकही डोस घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं लसीकरण झालं असतानाच दुसरीकडे मात्र एकही लस न घेण्याचा हा आकडाही खूपच जास्त आहे. अशांमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची गंभीरता वाढण्याची भीती आहे.
नागरिकांनी कोरोना लस घ्यावी राजेश टोपेंचं आवाहन
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी कोरोना लस घेतलेली नाही.
- काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे.
- त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
- कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या कोरोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत.
- परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे.
- त्यामुळे कोरोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.
- त्यामुळे नागरिकांनी कोरोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.
गेल्या २४ तासात राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या २४ तासात १८,९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासात २२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०२% एवढा आहे. राज्यात गेल्या २४ तासात रोजी एकूण २,२१,४७७ सक्रिय रुग्ण आहेत.आजपर्यंत राज्यात एकूण १२८१ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.मुंबईत ओमायक्रॉनचे एकूण ६०६ रुग्ण आढळले आहेत.
नक्की वाचा: बहुतांश लसवंत कोरोना संसर्गानंतर पाच दिवसात बरे! तर ऑक्सिजनवरील ९६ टक्के लसीकरण न झालेले!