Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रामदास बोट: ‘आपली टायटॅनिक’ बुडून ७५ वर्ष झाली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
रामदास बोट १

सुप्रिया

आजपासून ७५ वर्षांआधी १९४७ रोजी बलाढ्य अशी रामदास बोट अरबी समुद्रात बुडाली होती. या बोटीवर ७०० हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. स्वातंत्र्यपूर्व काळातली, स्वाभिमानी देशभक्तांनी काढलेल्या इंडिन को- ऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीची ही एस.एस. रामदास बोट. मुळात ही बोट स्कॉटलंडच्या स्वान अँड हंटर कंपनीत आकाराला आली. ‘क्वीन एलिझाबेथ’ ही आलिशान बोट या कंपनीने बांधली होती. त्याच कारखान्यात रामदास बोट तयार केली गेली.

एस.एस. रामदास बोटीची वैशिष्ट्ये

  • रामदास बोट ही १७९ फूट लांब आणि २९ फूट रुंद
  • बोटीचं एकूण वजन ४०६ टन
  • १ हजार प्रवासी वाहून नेण्याची क्षमता
  • अत्यंत देखणी अशी ही रामदास बोट १९३६ मध्ये नावारुपाला आली.
  • त्यानंतर काही वर्षांनी तिची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली.
  • ब्रिटिशांविरोधात उभं राहून कंपनीने कोकण गोवा किनारपट्टीवर बोट सेवा सुरु केली.

रामदास बोटीला १७ जुलै १९४७ रोजी जलसमाधी

रामदास बोट सकाळी ८ वाजता मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यावरुन रेवसला जाण्यासाठी निघाली. त्यादिवशी गटारी अमावस्या असल्याने प्रवाश्यांची आपलं घर गाठण्यासाठी मोठी गर्दी होती. मुंबईतले चाकरमानी सुटुट्यांमुळे आपल्या घरी जायला निघाली होती. वृद्ध,वारकरी,गर्भवती महिलांसह बोटीवर ७०० हून अधिक जण होते. बोट निघाली तेव्हा पाऊस पडत होता. अर्ध्या तासातच सर्वजण रेवसला पोहोचणार होते. बंदरापासून १३ किलोमीटरपर्यंत गेल्यावर उसळणाऱ्या लाटांचा तडाखा बसू लागला. त्याचवेळी एक मोठी लाट आली, बोट एका बाजूला कलंडली आणि काही मिनिटातच बोटीला जलसमाधी मिळाली.

१७ जुलै १९४७ रोजी ही दुर्घटना घडली आणि बरोबर एका महिन्याने १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. या दुर्घटनेचे पडसाद मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर पुढचे कितीतरी महिने जाणवत होते.


Tags: 75 Year To Ramdas ShipIndian Titanicmumbairamdas Shipरामदास बोट
Previous Post

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का, नरेंद्र मोदींना दंगलीत गुंतवण्यासाठी अहमद पटेलांकडून फायनान्सचा आरोप!

Next Post

देशात कोरोना लसीकरणाचा महाविक्रम! २०० कोटी डोसचा टप्पा पार!!

Next Post
200 cr Vaccination

देशात कोरोना लसीकरणाचा महाविक्रम! २०० कोटी डोसचा टप्पा पार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!