Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुदत सहा महिन्यांची, इस्त्रोचं मार्स ऑर्बिटर सात वर्षांनीही कार्यरत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
mars

मुक्तपीठ टीम

सलग सात वर्षे मंगळाला प्रदक्षिणा घालत असलेला मार्स ऑर्बिटर जबरदस्त कामगिरी बजावत आहे. मंगळ ऑर्बिटर मिशन हा अंतराळातील भारतीय पराक्रमाचा नवा पुरावा ठरला आहे. ५ नोव्हेंबर २०१३ रोजी इस्रोने मंगळ ऑर्बिटर प्रक्षेपित केल्यानंतर २४ सप्टेंबर २०१४ पासून मंगळाला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी ४५० कोटी रुपयांचे हे मिशन सहा महिने काम करेल, अशी अपेक्षा होती. परंतु हा अंदाज सकारात्मकरीत्या चुकीचा ठरला आहे. सहा महिने चालेल अशी अपेक्षा असणाऱ्या या मिशनने आता सात वर्षे पूर्ण केली आहेत.

 

मिशन मंगळ ऑर्बिटर

  • मंगळ ऑर्बिटर मोहिमेने पृथ्वीवरील सात वर्षे पूर्ण केली असली तरी मंगळाची तीनच वर्षे पूर्ण केली आहेत.
  • कारण, मंगळाचे एक वर्ष हे आपल्या दोन वर्षां एवढे आहे.
  • मंगळ ऑर्बिटरच्या प्रक्षेपणाच्यावेळी इस्रोचे अध्यक्ष के.राधाकृष्णन यांनी याचे संतोषजनक कामगिरी असे वर्णन केले.
  • भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेने सर्व उद्दिष्टे पूर्ण केली आणि भारतीय तांत्रिक पराक्रमाचे प्रदर्शन केले.
  • याद्वारे, इस्रोने अंतराळ मोहिमांची रचना, यंत्रणा आणि उपप्रणालींचा वापर, आंतरग्रहांचे प्रक्षेपण, दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणे, मंगळाभोवती अवकाशयान आणि वैज्ञानिक उपकरणांचा वापर शिकला.
  • यामुळे भारताने अवकाशातील एक प्रमुख स्थान मिळवले आहे.

 

मिशनविषयी इतर माहिती आणि त्याची सध्याची स्थिती काय आहे?

  • ७ वर्षे काम करूनही या ऑर्बिटची स्थिती चांगली आहे. असे एमओएमचे कार्यक्रम संचालक एम. अण्णादुराई म्हणाले.
  • त्यातील काही भागात समस्या होत्या. त्यामुळे अशी काही कामे थांबवण्यात आली आहेत, जी आता वापरात नव्हती.
  • अण्णादुराईंचा दावा आहे की, आताही हे मिशन आणखी एक वर्ष काम करू शकते.
  • एमओएमद्वारे सात वर्षे काम करण्यात आले. म्हणजेच नियोजनापेक्षा १४ पट जास्त काम करण्याचे कारण म्हणजे चांद्रयान-१ मोहिमेद्वारे मिळालेल्या अनुभवांवर आधारित सुधारणा आहेत.
  • एमओएममध्ये जास्तीत जास्त इंधन वापराची काळजी घेण्यात आली आहे.
  • अंतराळयान अधिक चांगल्या कॉन्फिगरेशनसह तयार केले गेले.

 

पाहा व्हिडीओ: 

https://youtu.be/6eV6QmZ8HNE

Tags: IndiaisroMarsmars orbitormuktpeethइस्त्रोके.राधाकृष्णनभारतमिशन मंगळमुक्तपीठ
Previous Post

सोमवार कमी रुग्ण संख्येचा वार! राज्यात २,४३२  नवे रुग्ण, २,८९५ रुग्ण बरे!

Next Post

कोकण वर्षा पर्यटन आणि रात्रीची मुंबई! महाराष्ट्राची पर्यटन विस्तार योजना!

Next Post
mtdc

कोकण वर्षा पर्यटन आणि रात्रीची मुंबई! महाराष्ट्राची पर्यटन विस्तार योजना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!