मुक्तपीठ टीम
भारतात अधिकृतपणे 5G लाँच होऊन एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. आता एअरटेल आणि जियोसारख्या दूरसंचार कंपन्या सध्या भारतात नेक्स्ट-जनरेशन नेटवर्क सेवा पुरवत आहेत. एअरटेलने आठ शहरांमध्ये आपली ‘5G प्लस’ सेवा सुरू केली आहे आणि जियो काही प्रमुख क्षेत्रांमध्ये 5G चाचण्या घेत आहे. सरकारने शक्य तितक्या लवकर वेगवान इंटरनेट सुविधेसह 5G नेटवर्कचा अवलंब करण्यावर भर दिल्यानंतर, आता स्मार्टफोन निर्माते सॅमसंग आणि अॅपल, नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात त्यांच्या 5G फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करतील.
लवकरच अॅपलच्या आयफोनला मिळणार 5G सपोर्ट!
- अॅपलने म्हटले आहे की, ते डिसेंबरपासून आयफोन यूजर्ससाठी 5G सॉफ्टवेअर अपडेट सुरू करतील.
- हे अपडेट आयफोन १४, आयफोन १३, आयफोन १२ आणि आयफोन एसईवर उपलब्ध असेल.
- कंपनीने म्हटले आहे की, ते शक्य तितक्या लवकर आयफोन यूजर्सना सर्वोत्तम 5G अनुभव देण्यासाठी भारतातील त्यांच्या भागीदारांसोबत काम करत आहे.
- त्यात म्हटले आहे की, नेटवर्क पडताळणी आणि गुणवत्ता चाचणी पूर्ण झाली आहे.
सॅमसंग 5G डिव्हाइसेस कधी अपडेट करणार?
- दक्षिण कोरियाचा हँडसेट निर्माता सॅमसंग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व 5G डिव्हायसेस अपडेट करेल.
- सॅमसंग इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही आमच्या वाहक भागीदारांसोबत जवळून काम करत आहोत आणि नोव्हेंबर २०२२ च्या मध्यापर्यंत आमच्या 5G डिव्हाइसेसवर OTA अपडेट्स आणण्यासाठी तयार आहोत.
५ जी अपडेटबाबत सरकारचे मत काय आहे?
- कंपन्यांनी लवकरात लवकर 5G साठी तयार व्हावे अशी सरकारची इच्छा आहे कारण ते केवळ अतिशय वेगवान इंटरनेट प्रदान करणार नाही तर आर्थिक प्रगतीचा वेग वाढवेल तसेच रोजगार निर्माण करेल.
- भारतातील लाखो लोकांकडे 5G फोन आहेत, परंतु ते सेवांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर दूरसंचार विभाग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्मार्टफोन कंपन्या आणि टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत बैठका घेतल्या आहेत.