Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सात वर्षांत पेटंट मान्यतेत ५७२% वाढ, एका वर्षात २८ हजार ३९१ पेटंट्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
piyush goyal

मुक्तपीठ टीम

भारताच्या पेटंट नोंदणीतील नव्या कामगिरीची आकडेवारी जाहीर झाली आहे. २०१३-१४ मध्ये ४,२२७ पेटंट्सना मान्यता देण्यात आली होती. त्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २८,३९१ पेटंट्सना मान्यता मिळाली आहे. यावरून पेटंट नोंदणीत तब्बल ५७२ टक्के वाढ झाल्याचे दिसत आहेत. तसेच पूर्वी पेटंट नोंदणीला तब्बल सहा वर्षे लागत असत आता फक्त वर्ष दोन वर्षात तेच काम होते. त्याचबरोबर भारतातील ट्रेड मार्क नोंदणीतही वाढ झाली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात ११ लाख ट्रेडमार्क्सची नोंदणी झाली. तर गेल्या ४ वर्षात हीच नोंदणी चौदा लाखांवर पोहचली.

 

वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी एका कार्यक्रमात विजेत्यांना राष्ट्रीय बौद्धिक संपदा पुरस्कार प्रदान केले. त्यावेळी त्यांनी ही नवी आकडेवारी जाहीर केली.

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सचिव डॉ. गिरिधर अरामाने आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील या आभासी माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

पुरस्कार सोहळ्याला संबोधित करताना गोयल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आणि आणि भविष्यातही ते अशी अनुकरणीय कामे करत राहतील अशी आशा व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रापासून ते स्टार्ट अप्स पर्यंत विविध क्षेत्रातील योगदानासह हे पुरस्कार खरोखरच सर्वसमावेशक होते,असे ते म्हणाले.

 

मंत्री म्हणाले की, आज तंत्रज्ञान आणि विविध कल्पना ही विकासाची दुहेरी इंजिन आहेत,बौद्धिक संपदा हक्क हे त्यांना ऊर्जा पुरवणारे इंधन आहे. आणि हा पुरस्कार केवळ व्यक्ती आणि संस्थांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनाच मान्यता देत नाही तर इतरांसाठी प्रेरणा म्हणून काम करतो.ते म्हणाले की, देशात सर्वसमावेशक प्रगती आणि बौद्धिक संपदा हक्क कायदे बळकट करण्यासाठी बौद्धिक संपदा क्रांती आणण्याची गरज आहे यामुळे रोजगार निर्मिती, गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि उत्पादन वाढेल,असे ते म्हणाले .

 

या कार्यक्रमाला संबोधित करताना गोयल म्हणाले की, यांनी खालील महत्वाच्या कामगिरीचा उल्लेख केला.

  • २०१३-१४ मधील ४,२२७ पेटंट्सना मान्यता दिल्याच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २८,३९१ पेटंटला मान्यता (५७२% वाढ.)
  • पेटंट परीक्षणासाठी असलेला वेळ डिसेंबर २०१६ मध्ये असलेल्या ७२ महिन्यांपासून डिसेंबर २०२० मध्ये १२-२४ महिन्यांपर्यंत कमी करणे
  • ७५ वर्षांदरम्यानच्या (१९४०-२०१५) ११ लाखांच्या तुलनेत ४ वर्षांमध्ये (२०१६-२०२०) १४.२ लाख ट्रेडमार्कची नोंदणी.

 

गोयल म्हणाले की, आपण २०२० मध्ये जागतिक नवोन्मेष निर्देशांकात भारताची क्रमवारी सुधारली असून या क्रमवारीत भारताचे स्थान ४८ वर आणले आहे. (२०१५-१६ मधील ८१ व्या क्रमांकावरून ३३ स्थानांनी झेप) मंत्री म्हणाले, आता आपण सर्वांनी जागतिक नवोन्मेष निर्देशांकात अव्वल २५ देशांमध्ये स्थान मिळविण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे.

 

भाषणाचा समारोप करताना मंत्री म्हणाले की, मोटारीपासून संगणकापर्यंत आणि शिवणकामाच्या यंत्रांपासून ते अंतराळ यानापर्यंत, आपण सर्वांना मानवतेच्या चांगल्या भविष्याची रचना करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ते म्हणाले की आपल्या बौद्धिक संपदेच्या कार्यक्षेत्राला अधिक निष्णात बनवण्यासाठी आपण सर्वांनी नव कल्पनांचे योगदान देणे आवश्यक आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: piyush goyalपियूष गोयलपेटंटरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
Previous Post

मूळ सातारचा फुटबॉलपटू अभिषेक सूर्यवंशी, मोहन बागान संघातून खेळणार!

Next Post

एमजी मोटर इंडियाची सर्वात स्वस्त ‘एस्टर’ मिनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच

Next Post
Astor

एमजी मोटर इंडियाची सर्वात स्वस्त ‘एस्टर’ मिनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही लाँच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!