मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सावांतर्गत १ ऑगस्टपासून सोशल मीडियावरील ‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेत लेखक, क्रिकेटपटू, खेळाडू, अॅक्टर्स असे अनेक सेलिब्रिटी यामध्ये सामील होणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सना या मोहिमेशी जोडण्यासाठी ते प्रचार करणार आहेत. भारतीय राष्ट्रध्वजांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने टपाल विभाग, राज्य सरकार आणि ई-कॉमर्स वेबसाइट्सशी बोलणी केली आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने मोहिमेला लोकप्रिय करण्यासाठी ५०० सेलिब्रिटींशी संपर्क साधला आहे. १३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या मोहिमेदरम्यान सेलिब्रिटी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय राष्ट्रध्वजासह फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करणार आहेत. १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांच्या सेल्फी विथ तिरंगा मोहिमेत हेच सेलिब्रिटी सर्वांना शुभेच्छा देणार आहेत.
‘प्रत्येक घरी तिरंगा’ योजनेमागील उद्देश काय आहे? हे ही आपण समजून घेऊया
- स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीची भावना आणि उत्साह पुन्हा जागृत करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
- लोक त्यांचे फोटो मायक्रो-ब्लॉगिंग साइट्स, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या इतर प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील अशी अपेक्षा आहे.
- यापूर्वी कॉर्पोरेट्स आणि बिगर सरकारी संस्थांनीही यात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
- कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘प्रत्येक घरी तिरंगा’ मोहिमेसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी वापरण्याची परवानगी दिली.
राजकारण होत राहिल. मात्र, देशाच्या राष्ट्रध्वजाला आपल्याही घरी फडकवण्याचा आनंद वेगळाच मी तो मिळणार, तुम्हीही मिळवा. जयहिंद!