Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाणे – कळवा रविवारी मध्यरात्रीपर्यंत रेल्वेचा धीम्या मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
train (2)

मुक्तपीठ टीम

जर तुम्हाला ठाण्याला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्यावतीनं करण्यात येत आहे. या निमित्ताने ठाणे ते कळवा या मार्गावर कट आणि कनेक्शनच्या कामासाठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून रविवारी मध्यरात्री २ पर्यंत आहे.

 

ठाणे आणि दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम

  • ब्लॉक कालावधीत ठाणे ते विटावा रोडदरम्यान पुलावर नवीन टाकलेले रेल्वे रूळ ‘कट’ करून हा मार्ग सध्याच्या डाउन आणि अप धीम्या मार्गांशी जोडला जाईल.
  • त्याचप्रमाणे क्रॉसओव्हर, टर्न आऊट, यार्ड रीमॉडेलिंगच्या संदर्भात रुळावरील डिरेलिंग स्विच, तसेच ठाणे आणि कळवा येथील इंटरलॉकिंग व्यवस्थेत बदल करणे व चालू करण्याची कामे ब्लॉक कालावधीत केली जातील.
  • अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि सिग्नल व दूरसंचार कामेही करण्यात येणार आहेत.

लोकल फेऱ्या १० मिनिटे विलंबाने धावतील

  • मध्य रेल्वेनं जाहीर केलेल्या ३६ तासांच्या ब्लॉकमध्ये ठाणे ते कल्याण दरम्यान एकही लोकल ट्रेन धावणार नाही.
  • ३६ तासाात मुख्य मार्गावरील ३९० लोकल फेऱ्या बंद ठेवण्यात येणार आहेत.
  • ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत.
  • धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गवरून वळविण्यात येतील.
  • यामुळे लोकल फेऱ्या १० मिनिटे विलंबाने धावतील.
  • या स्थानकांतील प्रवाशांना कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकातून प्रवास करण्याची मुभा असेल.
  • प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे मनपा आणि कल्याण-डोंबिवली मनपा यांना अतिरिक्त बस सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्या ट्रेन्स होणार रद्द?

शुक्रवार- शनिवार रद्द होणाऱ्या ट्रेन

  • १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस
  • १२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस
  • १७६११ नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस

शनिवार-रविवार रद्द होणाऱ्या ट्रेन

  • ११००७/११००८ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस
  • १२०७१/१२०७२ मुंबई-जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
  • १२१०९/१२११० मुंबई-मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
  • ११४०१ मुंबई-आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस
  • १२१२३/१२१२४ मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
  • १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस
  • १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस
  • १११३९ मुंबई-गदग एक्स्प्रेस
  • १७६१२ मुंबई-नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस

रविवार-सोमवार रद्द होणाऱ्या एक्स्प्रेस

  • ११४०२ आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
  • १११४० गदग-मुंबई एक्स्प्रेस

Tags: Central Railwaythaneठाणेदिवामध्य रेल्वेमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन
Previous Post

एमपीएससी मार्फत सहायक सरकारी अभियोक्ता पदाच्या ५४७ जागांवर भरती

Next Post

“पंतप्रधानांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा कट! ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने मारणे शक्य होते!”

Next Post
pm modi (2)

"पंतप्रधानांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा कट! ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने मारणे शक्य होते!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!