मुक्तपीठ टीम
ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) लिमिटेडची जुलैमध्ये एकूण देशांतर्गत प्रवासी वाहनांची वार्षिक विक्री ३३ टक्क्यांनी वाढून २८,०५३ युनिट्स झाली आहे. कंपनीने एका वर्षापूर्वी याच महिन्यात २१,०४६ युनिट्सची विक्री केली होती.
- देशांतर्गत उपयोगिता वाहनांची विक्री समीक्षाधीन कालावधीत ३४ टक्क्यांनी वाढून २७,८५४ युनिट्सवर गेली आहे.
- मागील वर्षीच्या याच महिन्यात २०,७९७ युनिट्स होती.
- जुलै २०२२ मध्ये कार आणि व्हॅनची विक्री २० टक्क्यांनी घसरून १९९ युनिट्सवर आली आहे.
- जुलै २०२१ मध्ये २४९ युनिट्सची विक्री झाली.
महिंद्रा अँड महिंद्राच्या मोटार वाहन विभागाचे अध्यक्ष विजय नाकरा यांनी स्पष्ट केले की, कंपनीच्या एक्सयुव्ही ७००, थॉर, बोलेरो आणि एक्सयुव्ही ३०० या ब्रँड्सना जोरदार मागणी आहे. ते म्हणाले की, पुरवठा साखळी स्थिती गतिमान आहे आणि आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. गेल्या महिन्यात व्यावसायिक वाहनांची विक्री १८.५६ टक्क्यांच्या वाढीसह २०,९४६ युनिट्सवर राहिली आहे, जी मागील वर्षी याच महिन्यात १७,६६६ युनिट्स होती.
- जुलै २०२१ मध्ये २७,२२९ युनिट्सच्या तुलनेत मागील महिन्यात एकूण ट्रॅक्टर्सची विक्री १४ टक्क्यांनी घसरून २३,३०७ युनिट्सवर आली.
- देशांतर्गत ट्रॅक्टर्सची विक्री देखील १६ टक्क्यांनी घसरून २१,६८४ युनिट्सवर आली आहे.
- वर्षभरापूर्वी याच महिन्यात ते २५,७६९ युनिट होते.