मुक्तपीठ टीम
भारतातील सर्वाधिक वेगाने वाढत असलेली इंटरनेट कॉमर्स कंपनी मीशोवर २३ ते २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेल आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये या कंपनीने आपली सर्वोत्तम सेल कामगिरी नोंदवली आहे. पाच दिवसांच्या या सेलमध्ये मीशोवर ग्राहकांनी ~३.३४ कोटी विक्रमी ऑर्डर्स नोंदवल्या. गेल्या वर्षीच्या सेलच्या तुलनेत यंदाच्या वर्षीच्या सेलमधील ऑर्डर्स ६८%नी जास्त आहेत. वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने सर्वात कमी किमतीवर खरेदी करण्याच्या सुविधेचा पुरेपूर लाभ मीशो ग्राहकांनी घेतला आहे.
इंटरनेटमार्फत व्यापाराची सुविधा देशातील जास्तीत जास्त नागरिकांना मिळावी हे मीशोचे मिशन आहे आणि त्याला अनुसरून तब्बल ६०% ऑर्डर्स देशातील ४+ श्रेणीच्या शहरांमधून दिल्या गेल्या आहेत. मीशोचे हे यश दर्शवते की परवडण्याजोग्या किमती हे त्यांचे वैशिष्ट्य त्यांची एक आगळीवेगळी ओळख निर्माण करत आहे. खरेदीविक्री करणाऱ्या युजर्सची संख्या देखील या सेलच्या काळात ६०% नी वाढली आहे. ई-कॉमर्सचा वापर पहिल्यांदा करत असलेले आणि ऑनलाईन खरेदी देखील पहिल्यांदा करत असलेले अनेक ग्राहक यामध्ये आहेत. हिमाचल प्रदेशात ऊना आणि आंध्र प्रदेशात चिमकुरथी पर्यंत, पश्चिम बंगालमधील कालिम्पोन्ग ते गुजरातेत भरूच आणि लेह पर्यंत संपूर्ण देशभरात मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलचा दबदबा होता. संपूर्ण भारताच्या सणासुदीच्या खरेदीच्या इच्छा पूर्ण करण्यात मीशो मेगा ब्लॉकबस्टर सेलने खूप मोठे योगदान दिले आहे.
मीशोवर संपूर्ण देशभरातून ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या त्यामुळे मीशोवरील लघु उद्योजकांनी या फेस्टिव्ह सेलमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ साध्य केली आहे. या उद्योगक्षेत्रात प्रथमच मीशोने सादर केलेल्या झीरो पर्सेंट सेलर कमिशन उपक्रमामुळे भरपूर एमएसएमईना डिजिटाईज होण्यात मदत मिळाली आहे, त्यांनी या सेलच्या काळात कमिशनच्या १०४ कोटी रुपयांची बचत केली. मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये विक्रेत्यांचा सहभाग गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ पटींनी वाढला आहे, यातील ~७५% विक्रेते द्वितीय आणि त्याहीपेक्षा खालच्या श्रेणीतील बाजारपेठांमधील आहेत. सेलमुळे तब्बल २०,००० विक्रेते लक्षाधीश व २४ विक्रेते कोट्याधीश बनले आहेत.
मीशोचे संस्थापक व सीईओ विदित आत्रे यांनी सांगितले, “मीशोच्या ब्लॉकबस्टर सेलने यंदाच्या वर्षी खऱ्या अर्थाने भारताच्या सणासुदीच्या खरेदीच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. आपल्या ग्राहकांना सर्वात कमी किमतींना दर्जेदार उत्पादने मिळवून देण्यावर आम्ही आमचे लक्ष केंद्रित केले, त्याचे हे फलित आहे. फेस्टिव्ह सेलमध्ये ८०% जास्त ऑर्डर्स २+ श्रेणीच्या शहरांमधून आल्या आहेत. वस्तूंची निवड आणि परवडण्याजोग्या किमती याबाबतच्या ज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि ज्यांना आजवर इंटरनेटवर खरेदीविक्रीचे लाभ मिळू शकलेले नाहीत अशा लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. भारतात जिथे इंटरनेटमार्फत व्यापाराची सुविधा अद्याप पोहोचलेली नाही अशा प्रत्येक भागापर्यंत आम्ही पोचू इच्छितो. फेस्टिव्ह सीझनमध्ये मीशोवर लघु उद्योजकांना मिळत असलेले यश पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना जास्त वृद्धी प्रदान करण्याच्या प्लॅटफॉर्मच्या उभारणीच्या आमच्या प्रयत्नांना आता अजून जास्त बळ मिळाले आहे.”
यावर्षीच्या सेलमध्ये स्वयंपाकघरात उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंसारख्या विभागांमध्ये ११६% वाढ झाली आहे; सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल विभागात १०९% आणि लगेज व प्रवासादरम्यान लागणाऱ्या ऍक्सेसरीजमध्ये ९९% वाढ झाली आहे. फॅशन, घर व स्वयंपाकघर, इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज व सौंदर्य आणि वैयक्तिक देखभाल या विभागांमध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. साड्या, ब्ल्यूटूथ हेडफोन, दुपट्टा, लिपस्टिक, मंगळसूत्र, स्मार्ट वॉचेस, आर्टिफिशियल प्लांट्स व ज्यूसर्स यासारख्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाली आहे. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक मूल्य हा घटक किती महत्त्वाचा मानतात ते यामधून दिसून येते.
मीशो महा दिवाळी सेल ७ ते ११ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत आयोजित केला जाणार आहे. कोट्यावधी दर्जेदार उत्पादने सर्वात कमी किमतींमध्ये विकत घेण्याची आणखी एक सुवर्णसंधी ग्राहकांना मिळणार आहे. जवळपास ८ लाख विक्रेते आणि ३० विभागांमधील ६.५ कोटी सक्रिय प्रॉडक्ट लिस्टिंग्स यांच्यासह अजून लाखो भारतीय ग्राहकांचे प्रथम पसंतीचे शॉपिंग डेस्टिनेशन बनावे हे मीशोचे उद्दिष्ट आहे.