Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आईचा जागर, डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Dahanu Mahalakshmi Temple Trust

मुक्तपीठ टीम

यंदाचा नवरात्रोत्सव अगदी जल्लोषात साजरा होत आहे. मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. असेच एक मंदिर म्हणजे पालघर जिल्ह्यातील लाखो भक्तांची कुलदैवत असलेल्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेचे मंदिर. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या मंदिरात पालघर तसेच महाराष्ट्राबाहेरील गुजरात आणि राजस्थान या परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी ट्रस्टकडून घेण्यात येत आहे.

 Dahanu Mahalakshmi Temple Trust

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आदिवासींकडूनच पूजा केली जाते. पालघर मधील महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून ही माता नवसाला पावणारी असल्याचा समज भाविकांचा आहे. कोल्हापूरची आदिमाता सुरत कडे जात असताना तिला डहाणूतील हा निसर्गरम्य परिसर आवडल्याने ती महालक्ष्मी गडावर वास्तव्यास राहिली अशी ही आख्यायिका सांगितली जाते .महालक्ष्मी मातेची पायथ्याशी आणि गडावर अशी दोन मंदिर असून मातेच्या दर्शनासाठी भक्त गर्दी करताना दिसत आहेत.

डहाणू महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कडून चोख व्यवस्था-

  • डहाणू महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने या नवरात्रोत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे.
  • मंदिराचे सुंदर सुशोभीकरण केले आहे.
  • मंदिराच्या पूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.
  • त्याचसोबत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत.
  • गरोदर माता व ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र व्यवस्था महालक्ष्मी मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे.

 Dahanu Mahalakshmi Temple Trust

या मंदिराची ऐतिहासिक कथा-

  • डहाणू तालुक्यात हे मंदिर विव्हळवेढे पश्चिमेला ६०० फूट उंच असणाऱ्या डोंगरावर वसलेले आहे.
  • जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी याची स्थापना केली.
  • नवरात्रोत्सव आणि अन्य उत्सवाला लाखो भाविकांची गर्दी याठिकाणी उसळते.
  • एका गर्भवतीला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी खूप ओढ लागली होती.
  • मात्र इतक्या उंच डोंगरावर जाणे तिच्यासाठी अशक्य होते.
  • यावेळी या गरोदर महिलेने देवीला साकडे घातले की, मला तुझे दर्शन घ्यायचे आहे, त्यानंतर देवी गडावरून पायथ्याशी आली व दर्शन दिले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.

जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या आई भावनादेवी सांबरे यांच्या हस्ते या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आरती संपन्न झाली. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था मागील अनेक वर्षांपासून पालघरसह कोकणात आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांवर काम करते . दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य आणि शिक्षण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या मार्फत पोहोचवले जात असून भावनादेवी सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची स्थापना झाली आहे. दिव्यांगाना होणारी अडचण लक्षात आल्यावर २०१६ मध्ये जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने दिव्यांगांसाठी शाळा सुरू केली. या दिव्यांग शाळेत ३२ अंध २४ मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यापैकी पाच अंध विद्यार्थिनी यूपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात आठ रुग्णवाहिका जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने उपलब्ध करून दिल्या असून आणखी दोन रुग्णवाहिका पालघर आणि डहाणू तालुक्यांसाठी देण्यात आल्या. याचं लोकार्पण सोहळा भावना देवी सांबरे यांच्या हस्ते महालक्ष्मी मातेच्या मंदिर परिसरात संपन्न झाला. महालक्ष्मी मातेच्या आरतीचा मान मिळाल्याने भावना देवी सांबरे यांच्याकडून ही समाधान व्यक्त करण्यात आलं .

पाहा:


Tags: Dahanu Mahalakshmi Temple Trustgood newsJijau Educational and Social OrganizationJijau Founder Nilesh SambaremuktpeethNavratri Festivalघडलं-बिघडलंचांगली बातमीजिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थाजिजाऊ संस्थापक निलेश सांबरेडहाणू महालक्ष्मी मंदिर ट्रस्टनवरात्रोत्सवमुक्तपीठ
Previous Post

धो धो पावसात राहुल गांधी यांचं भिजत झंझावाती भाषण

Next Post

मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये ३ कोटी ३४ लाख ऑर्डर्स! २० हजार विक्रेते लक्षाधीश!

Next Post
Meesho

मीशोच्या मेगा ब्लॉकबस्टर सेलमध्ये ३ कोटी ३४ लाख ऑर्डर्स! २० हजार विक्रेते लक्षाधीश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!