मुक्तपीठ टीम
राजस्थानच्या उदयपूरमध्ये ओमायक्रॉनमुळे ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. देशातील ओमायक्रॉनचा हा दुसरा बळी आहे. या नव्या विषाणू व्हेरिएंटने बाधिताचा पहिला मृत्यू महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवडमध्ये झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू हा पोस्ट कोरोना निमोनियामुळे झाला आहे. या वृद्धाने कुठेही प्रवास केलेला नव्हता. तसंच २१ आणि २२ डिसेंबरच्या चाचणीत त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. २५ डिसेंबरला ते ओमायक्रॉनबाधित असल्याचं समोर आलं. त्यांना डायबेटिस, हायपरटेंशन आणि हायपोथॉयरोडिज्मच्या व्याधी होत्या, त्यासोबतच ते ओमायक्रॉनबाधित झाले आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजस्थानमध्ये आतापर्यंत ६९ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. यातल्या ४७ जणांनी मात केलीय तर २२ जणांवर उपचार सुरु आहेत. ओमायक्रॉनबाधितांच्या यादीत राजस्थान हा देशात ५ व्या स्थानी आहे.
महाराष्ट्रात गेला होता पहिला ओमायक्रॉन बळी
महाराष्ट्रात गुरुवारी ५२ वर्षीय पुरुषाचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाला आहे. ते २ आठवड्यांपूर्वी नायजेरियातून आले होते. त्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता. २८ डिसेंबरला त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर संशय आल्यामुळे त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले. यात त्यांचा ओमायक्रॉनचा अहवाल पॉजिटिव्ह आला.
महाराष्ट्रातील ओमायक्रॉन स्थितीची माहिती
आज राज्यात १९८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ( एन. आय. व्ही.) रिपोर्ट केले आहेत.
- एन आय व्ही ने रिपोर्ट केलेल्या १९८ रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.
रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील खालीलप्रमाणे –
- मुंबई – १९०
- ठाणे मनपा- ४
- सातारा, नादेंड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड – प्रत्येकी १
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग़्णालयात नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. या रुग्णास मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या एन आय व्ही अहवालात त्याला ओमायक्रॉन विषाणू संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- आजपर्यंत राज्यात एकूण ४५० ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी १२५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.