मुक्तपीठ टीम
देशातील कोरोनाचा कहर नियंत्रणात येत असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयातील २९ वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. धक्कादायक बाब अशी की त्यांच्यापैकी २७ विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. कोरोना झालेल्यांपैकी दोन जणांना मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे ती गर्दीच त्यांना भोवल्याचं म्हटलं जातं.
सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थी
केईएम रुग्णालयातील या कोरोना उद्रेकाबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सांगितले की, हे विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आले आणि काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ते कोरोना पॉझिटिव्ह झाले.
- २९ पैकी ७ विद्यार्थी प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत.
- तर, उर्वरित २३ हे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत.
- मुंबईतील केईएम रुग्णालय हे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
- कोरोना काळात ते कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले.
- अशा परिस्थितीत, जर इतक्या लोकांमध्ये संसर्गाची पुष्टी झाल्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने अधिक डॉक्टरांची तपासणी सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील कोरोना आकड्यांमध्ये…
- गुरुवारी राज्यात ३,०६३ नवीन रुग्णांचे निदान.
- मुंबईत ४५१ नवे रुग्ण सापडले.
- गुरुवारी ३,१९८ रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यात गुरुवारपर्यंत एकूण ६३,७१,७२८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२७% एवढे झाले आहे.
- राज्यात गुरुवारी ५६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- गुरुवारीपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८७,३९,९७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,५०,८५६ (११.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,४५,४२७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,४२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात गुरुवारी रोजी एकूण ३६,४८४ सक्रिय रुग्ण आहेत.