मुक्तपीठ टीम
राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबद्दलची माहिती दिलेली नसणं बच्चू कडूंना महागात पडल्याचे दिसत आहे. भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी २०१७ मध्या बच्चू कडू यांच्याविरोधात याप्रकरणी तक्रार केली होती. फ्लॅट दोन महिन्यांच्या आधी विकलेला असल्याने त्यांची माहिती नसल्याचा दावा बच्चू कडू यांनी २०१७मध्ये केला होता.
बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारं प्रतिज्ञापत्र सादर केलं.
- यात त्यांनी त्यांच्या मुंबईतील फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती.
- याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली.
- या खटल्यात चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने निकाल दिला.
बच्चू कडूंनी फेटाळले होते आरोप
- बच्चू कडू यांनी त्यावेळी या प्रकरणातील सर्वा आरोप फेटाळले होते.
- राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घर उपलब्ध करुन दिले होते.
- त्यासाठी बँकेचे ४० लाख रुपये कर्जसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आले होते.
- पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्यांच्या आधी ते विकण्यात आल्याचा दावा बच्चू कडूंनी त्यावेळी केला होता.
- त्यामुळे आपल्यावरील सर्व आरोप खोटे होते,असे २०१७ मध्ये बच्चू कडूंनी सांगितले होते.