Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महत्वाच्या विधेयकाच्यावेळी कुठे होते खासदार? सत्ताधाऱ्यांसह विरोधकही गायब!

मोंदींच्या इशाऱ्यालाही जुमानत नाहीत भाजपा खासदार?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parliment

मुक्तपीठ टीम

खासदार म्हटले की आम्ही कायदे करणारे असा एक अभिमान आढळतो. पण हेच कायदे करण्याचे काम चालते तेव्हा मात्र संसदेच्या सभागृहांमध्ये किती खासदार उपस्थित राहण्याची तसदी घेतात, हा चिंतेचा विषय आहे. आता क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन बिल या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या महत्वाच्या विधेयकाचंच पाहा. हे विधेयक लोकसभेत सादर झाले तेव्हा पुरेसे खासदार लोकसभा सभागृहात हजर नव्हते.

 

विरोधकांनी विधेयक सादर करताना मतदानाची मागणी केली तेव्हा सत्ताधारी एनडीच्या ३२६ पैकी १२०च खासदार हजर होते. मात्र विरोधकांना त्याचा फायदा घेता आला नाही, कारण त्यांचे त्यापेक्षाही कमी खासदार हजर होते! एवढेच नव्हे तर या महत्वाचे बदल घडवणाऱ्या विधेयकाच्यावेळी सत्ताधारी-विरोधकांचे मोठे नेतेही नव्हते! पण सभागृहाचे कामकाज योग्य संख्याबळ राखत चालवणं ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी माली जाते. विरोधकांना सरकारला नामुष्की सहन करण्याची संधी सत्ताधाऱ्यांनी द्यायची नसती. सोमवारी मात्र तसं घडणार होतं. तेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील उपस्थितीबद्दल वारंवार इशारे देऊनही. त्यामुळे आता मोदींच्या इशाऱ्यालाही न जुमानणाऱ्या भाजपा खासदारांवर कारवाईही होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं विधेयक, दोन तृतीयांश खासदार लोकसभेत गैरहजर!

  • संसदीय कामकाजाप्रती खासदार किती गंभीर असतात ते सोमवारी लोकसभेत पाहायला मिळाली.
  • गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे गुन्हेगारी प्रक्रिया (ओळख) विधेयक सादर करण्यात आले.
  • ते सादर करताना दोन तृतीयांश खासदार सभागृहात गैरहजर होते.
  • दरम्यान सत्ताधारी खासदारांसह विरोधकही यावेळी गैरहजर होते.

 

अनेक ज्येष्ठ नेतेही गैरहजर!

  • जेव्हा विरोधकांनी विधेयकावर मत विभाजनाची मागणी केली होती तेव्हा ५४३ सदस्यांच्या लोकसभेत १७८ पेक्षा कमी सदस्य उपस्थित होते.
  • यावेळी दोन्ही पक्षांचे खासदारच नव्हे तर ज्येष्ठ नेतेही सभागृहात उपस्थित नव्हते.
  • गोव्यात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते गेले.
  • तर सोनिया गांधी, राहुल गांधी, मुलायम सिंह यादव, एचडी देवेगौडा, फारुख अब्दुल्ला हे ज्येष्ठ नेतेही या काळात सभागृहात उपस्थित नव्हते.

मोंदींच्या इशाऱ्यालाही जुमानत नाहीत भाजपा खासदार?

  • गेल्या लोकसभेपासून पंतप्रधान सातत्याने खासदारांना अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहण्याचा इशारा देत आहेत.
  • खासदारांच्या या वृत्तीमुळे संतप्त झालेल्या पंतप्रधानांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात खासदारांना स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा इशाराही दिला होता.
  • स्वत:ला बदला नाहीतर बदल आपोआप होईल, असे ते म्हणाले होते.
  • मात्र त्याचा खासदारांवर काहीही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.
  • सध्या लोकसभेत एनडीएच्या सदस्यांची संख्या ३२६ आहे, मात्र यापैकी केवळ १२० खासदार सभागृहात उपस्थित होते.
  • जर विरोधकांचे जास्त खासदार हजर असते तर महत्वाचे विधेयक मागे घेण्याची नामुष्की आली असती.
  • त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांची गैरहजेरीवर गंभीर उपाय योजतील, अशी शक्यता आहे.

Tags: BJPloksabhaNarendra modiखासदारनरेंद्र मोदीभाजपालोकसभा
Previous Post

पोलीस बनवणार अटक केलेल्यांची संपूर्ण ‘बायो कुंडली’! काय घडणार, काय बिघडणार?

Next Post

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post
Ajit pawar

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!