मुक्तपीठ टीम
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलींची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील सोळा वर्षी कबड्डीपटूवर कोयत्याने वार करून तीन जणांनी निर्घृण हत्या केली आहे. ही घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा खून मुलीच्या नात्यातील व्यक्तीनेच केल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय? असा प्रश्न चित्रा वाघ यांना राज्य सरकारला विचारला आहे.
नेमकं प्रकरण काय?
- मुलगी कबड्डी खेळत असताना कोयता, चाकूने वार
- मिळालेल्या माहितीनुसार बिबवेवाडी परिसरात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी कबड्डी खेळत होती.
- यावेळी आजूबाजूला काही छोटी मुलं तसेच इतन नागरिक व्यायाम करत होते.
- दरम्यान, मुलगी कबड्डी खेळत असताना तिच्याच नात्यातील एका आरोपीने अन्य दोन व्यक्तींसह तिचा खून केला.
- तिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
- बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स येथे ही घटना घडली.
- मुलीवर वार करत असताना हा सर्व प्रकार मुलीच्या मैत्रिणींनी व प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पाहिला आहे.
- या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
- पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
- उपचारासाठी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- मात्र यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता
पुण्यातील या घटनेमुळे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधीपक्ष नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे म्हणत त्यांनी सरकार सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करतंय अशी खोचक प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका
- “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय? कोयत्याने वार करून खून करण्यात आला.
- टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे.
- त्या मुलीने काय भोगलं असेल..?
- राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे.
- पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत.
- च्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय?