मुक्तपीठ टीम
रविवारी महाराष्ट्रातील जळगाव येथे भीषण अपघात झाला. येथे किनगावजवळ एक पपईचा ट्रक पलटी झाला. त्यात २१ कामगारही बसले होते. यापैकी १६ जणांचा मृत्यू आणि ५ जण जखमी आहेत. रविवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
पपया भरलेला आयशर चोपडाकडून यावलकडे येत होता. दरम्यान यावल अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गावर किनगावजवळ एका वळणावर ट्रकचा रॉड तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अपघाताची माहिती मिळताच जळगाव आणि यावल येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पलटी झालेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने सरळ करण्यात आला. त्यानंतर कामगरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर दोन जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघातात मृत्यू झालेल्या १६ पैकी १५ जणांची ओळख पटली आहे. यामध्ये मृत कामगारांपैकी सहा कामगार एकाच कुटुंबातील आहेत. इतर मृतांमध्ये दोन मुले आणि सहा महिलांचा समावेश आहे. हे सर्व जळगावच्या रावेर तहसीलचे रहिवासी आहेत. दररोज, हे मजुरीसाठी किनगाव येथे जात होते.
मृतांची नावे –
- संदीप भालेराव – विवरा
- अशोक वाघ – अभोडा
- दुर्गाबाई भालेराव – अभोडा
- गणेश मोरे – 05 अभोडा
- शारदा मोरे – 15 अभोडा
- सागर वाघ – 03 अभोडा
- संगीता वाघ -35 अभोडा
- सुमंबाई इंगळे – 45 अभोडा
- कमलाबाई मोरे – 45 अभोडा
- सबनुर तडवी – 55 अभोडा
- नरेंद्र वाघ – 25 अभोडा
- दिगंबर सपकाळे – 55
- दिलदार तडवी – 20
- शेख हुसेन शेख मुस्लिम मणियार – 30 रावेर
- सरफराज तडवी – 32 केराळा