मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉल मारहाणप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. जितेंद्र आव्हाड यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. आव्हाड यांना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे आता आव्हाडांचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
१५ हजाराच्या जातमुचलक्यावर आव्हाडांना जामीन मंजूर!!
- जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- आव्हाडांसह १२ जणांना जामीन मंजूर झाला आहे.
- पुराव्याशी छेडछाड न करण्याच्या अटींसह जामीन मंजूर झाला आहे.
- तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने आव्हाडांना दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय ?
- विवियामा मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना प्रेक्षकाला केलेल्या मारहाणीविरुद्ध जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती.
- या अटकेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलंय.
- जितेंद्र आव्हाड यांच्यासह अकरा जणांना आज कोर्टात हजर करणार आलं.
- जितेंद्र आव्हाड यांच्यावर एकूण सात कलमं वर्तक नगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली लावली आहेत.
- दरम्यान, सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.
- आव्हाडांना करण्यात आलेली अटक ही सरकार हुकूमशाहीपणे वागत असल्याचा पुरावा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर ठाणे न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. न्यायालय परिसरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमू नये याचीही दक्षता पोलिसांकडून घेतली जात आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयाबाहेर जमून घोषणाबाजीही केली.
जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा सत्र न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. जितेंद्र आव्हाड यांचे अनेक समर्थक हे कोर्टाबाहेर जमल्यानं पोलिसांनी मौठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान, विवियाना मॉलमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते – जितेंद्र आव्हाड
- जितेंद्र आव्हाड यांना आज ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आणण्यात आलं.
- यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली.
- नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला.
- मी स्वत:हून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलो होतो. पण मला खोटं बोलवून अटक करण्यात आली.
- मला अटक व्हावी म्हणून पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्यात आला.
- ते म्हणाले पोलिसांना एका चाणक्याचे वारंवार फोन येत होते.
- मला अटक करण्यास सांगितलं जात होतं.
- माझी अटक बेकायदेशीर आहे.
- अटक करताना नियमांचं पालन केलं गेलं नाही. प्रोटोकॉल पाळले गेला नाही.