Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sc

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र भाजपाच्या १२ निलंबित आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द केलं आहे. त्यामुळे आघाडी सरकारला दणका बसला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी ५ जुलै २०२१ रोजी भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.

 

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

  • अधिवेशनातील निलंबन अधिवेशनापुरतं मर्यादित असावं.
  • एक वर्ष इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबनाचा अधिकार सदनाला नाही.
  • त्यामुळे भाजपा आमदारांचं निलंबन घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे.
  • त्यामुळे सर्वोच्च न्यायालय हे निलंबन रद्द करत आहे.
  • हा ऐतिहासिक निर्णय भविष्यातील कारवायांसाठी दिशादर्शक ठरणार आहे.

विधानसभेत नेमकं काय घडलं होतं?

  • अधिवेशन काळात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत ओबीसींचा इम्पिरिकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला.
  • केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळवण्याबाबत हा ठराव होता.
  • या ठरावाला भाजप आमदारांनी जोरदार विरोध केला.
  • यावेळी भाजपच्या काही आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.
  • विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
  • तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
  • त्यानंतर भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.
  • या कारवाईला भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला होता.
  • त्यानंतर भाजपच्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आमच्यावर सूड भावनेने कारवाई केल्याचं म्हटलं होतं.
  • आमच्यावर अन्याय झाल्याचंही भाजपा आमदारांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं होतं.

 

या आमदारांचं निलंबन

  • आशिष शेलार
  • योगेश सागर
  • अभिमन्यू पवार
  • संजय कुटे
  • अतुल भातखळकर
  • पराग अळवणी
  • गिरीश महाजन
  • राम सातपुते
  • हरीश पिंपळे
  • नारायण कुचे
  • जयकुमार रावत
  • किर्तीकुमार बागडीया

Tags: BJPSupreme CourtThackeray Govtठाकरे सरकारभाजपासर्वोच्च न्यायालय
Previous Post

घ्या आता रिचवा वाइन! सुपर मार्केट, किराणा दुकानातही वाईन विक्रीची संकल्पना! फडणवीस म्हणतात हे सरकार तर ‘मद्यराष्ट्र’ बनवतेय!

Next Post

रेल्वे भरती: बिहार का पेटला? समजून घ्या कारण आणि राजकारण

Next Post
railway candidates Protest

रेल्वे भरती: बिहार का पेटला? समजून घ्या कारण आणि राजकारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!