मुक्तपीठ टीम
देशाने कोरोनाविरूद्धच्या लढ्यात लसीकरणात उच्चांक गाठला आहे. एका दिवसात देशात सर्वाधिक १ कोटी नागरिकांना डोस देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून ही माहिती दिली, त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी देशात लसींचे ८८ लाखांहून अधिक डोस देण्यात आले होते.
या कामगिरीची घोषणा करताना आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्वीट केले, “सगळ्याची साथ, सगळ्याचा विकास, सगळ्यांचा विश्वास, सगळ्याची प्रार्थना. हा तोच प्रयत्न आहे ज्याद्वारे देशाने एका दिवसात १ कोटीहून अधिक लस देण्याचा टप्पा पार केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आणि पंतप्रधान मोदींजींचा ‘प्रत्येकासाठी लस, मोफत लस’ हा निर्धार फळाला आला आहे. “या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,” आज विक्रमी लसीकरण झाले. १ कोटींचे लक्ष्य गाठणे मोठे यश आहे. जे लोक लस घेत आहेत आणि जे लोक लसीकरण अभियानामध्ये सहभागी आहेत त्या सर्वांचे अभिनंदन.
सबका साथ
सबका विकास
सबका विश्वास
सबका प्रयासयह वही प्रयास है जिससे देश ने 1 दिन में 1 करोड़ से अधिक टीके लगाने का आँकड़ा पार कर लिया है। स्वास्थ्यकर्मियों का अथक परिश्रम व PM @NarendraModi जी का #SabkoVaccineMuftVaccine का दृढ़ संकल्प रंग ला रहा है। pic.twitter.com/hHlUU4q3fv
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) August 27, 2021
आतापर्यंत ६२ कोटी १७ लाख लसींचे डोस!
- आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एकूण १ कोटी ६४ हजार ३२ लोकांना लस देण्यात आली आहे.
- यासह, देशात आतापर्यंत एकूण लसीचे ६२,१७,०६,८८२ डोस देण्यात आले आहेत.
- ४८,०८,७८,४१० लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
- तर १४, ०८,२८,४७२ लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.