Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बसपाच्या मायावतींची घोषणा, अनुसूचित जातीतीलच असणार वारसदार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mayawati

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बसपा प्रमुख मायावती यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा वासदार हा अनुसूचित जातीतीलच असेल, असेही घोषीत केले आहे. एवढेच नव्हे तर मायावतींनी त्यांच्या पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसवर केला आहे.

 

मायावतींचा वारसदार!

त्यांनी सांगितले की, त्यांच्या वारसदाराबद्दल सध्या अंदाज लावण्याची गरज नाही. कारण आता मी फिट आहे. जेव्हा मी पक्षाचे नेतृत्व करू शकणार नाही, तेव्हा मी स्वतः त्याची घोषणा करेन. माझा वारसदार हा अनुसूचित जातीतलाच असेल, ज्याला मी आणि पक्षाने प्रामाणिकपणे घडवलेले असेल. आतापर्यंत पक्षाने अनेक चढउतार पाहिले आहेत. काशी राम यांनी आजारी असताना आपल्या वारसदाराची घोषणा केली असे मायावतींनी सांगितले.

 

मायावतींचा काँग्रेसवरही जोरदार हल्ला

  • मायावतींनी सांगितले की, काँग्रेस जमाव जमा करण्यासाठी पैसे आणि अन्नाचे आमिष दाखवत आहे.
  • अलीकडेच काँग्रेस पक्षाने २४ पानांची पुस्तिका तयार केली आहे.
  • ही पुस्तिका कार्यकर्त्यांमध्ये वाटली जाईल.
  • आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या पुस्तिकेत उल्लेख आहे की, बसपासह इतर पक्षांनी राज्यात काँग्रेसविरोधात गैरसमज निर्माण केले आहेत.
  • यावर प्रतिक्रिया देताना बसपा सुप्रीमो मायावतींनी सांगितले की, लोकांना अन्न आणि पैशाचे आमिष दाखवून काँग्रेसने त्यांना त्यांच्या सभांमध्ये आणले, ही काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे.
  • काँग्रेस पक्षाने आता आपला जनाधार गमावला आहे, असे यातून दिसून येते.
  • आता गरज आहे ती काँग्रेस पक्षाने या पुस्तिकांमध्ये आपल्या उणीवा अधोरेखित केल्या पाहिजेत आणि सर्व विरोधी पक्षांना दोष देण्याऐवजी त्यांनी त्यांचे स्वत: कडे लक्ष दिले पाहिजे.
  • मायावतींनी आरोप केला की, उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसला तिकिट देण्यासाठी लोकांना शोधावे लागत आहे.

 

काँग्रेसकडून उद्योगपतींची मदत

  • ते उद्योगपतींची मदत घेत आहे जेणेकरून ते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निधी देऊ शकतील.
  • काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी अस्वस्थ आहे.
  • पण काँग्रेस पक्षाची चुकीची धोरणे, कार्यसंस्कृती आणि दुटप्पीपणा हे आज सत्ता जाण्याचे सर्वात मोठे कारण आहे.
  • काँग्रेस लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबत आहे पण आज लोकांना काँग्रेसच्या युक्त्या समजल्या आहेत.
  • ते अशा अनेक पुस्तिका जारी करू शकतात परंतु ते त्यांना मदत करणार नाही.

Tags: CongressmayawatiSCUPअनुसूचित जातीउत्तर प्रदेशकाँग्रेसबसपामयावती
Previous Post

“मंदिरे उघडण्यासाठी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा”

Next Post

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचं मोठं यश, एका दिवसात एक कोटींचं लसीकरण!

Next Post
vaccination

कोरोनाविरोधातील लढ्यात भारताचं मोठं यश, एका दिवसात एक कोटींचं लसीकरण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!