गावी गेल्यावर रात्री आजीआजोबा किंवा इतर मोठीमाणसे आपल्याला त्यांना आलेले भुताचे अनुभव सांगतात. टिव्हीवर आपण “हॉरर” चित्रपट पाहतो. कॉलेजमध्ये देखील मुलं कट्ट्यावर एकत्र जमली तर गप्पांच्या ओघात भुताच्या गोष्टी केल्या जातात. प्रवासादरम्यानसुद्धा अनेकदा रात्रीच्यावेळी भुतपिशाच्च यांच्या विषयी गोष्टी होत असतात. या गोष्टी ऐकताना अनेकदा बरेचजण घाबरले नसल्याचा आव आणतात परंतु मनातून मात्र त्यांची चांगलीच फाफलली असते. या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या बाबतीतच होतात असे नाही. काही सेलिब्रेटींच्या बाबतीतसुद्धा हे प्रकार घडले आहेत. जे वाचल्यावर तुम्हीसुदधा थक्क व्हाल.
अभिनेत्री क्रिती सॅनॉनला ‘दिलवाले’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक भयानक अनुभव आला. क्रितीच्या मेकअप आर्टिस्टला कोणीतरी ढकलत असल्याचे भास होत होते. त्याचवेळी कुणीही स्पर्श केल नसूनही लोणीची बाटली टेबलवरून पडली. त्यानंतर ती उचलली आणि त्याच ठिकाणी परत ठेवली मात्र पुन्हा ती बाटली पडली. जेव्हा बारकाईने पाहिले तेव्हा समजले की तेथे टेबल हलत नव्हता आणि वारापण नव्हता. नेमके काय घडले हे समजलं नसले तरी तो प्रसंग अत्यंत घाबरविणारा असल्याचे क्रितीने सांगितले.
दरम्यान, अभिनेत्री सनी लिओनीने या संबंधित एक अनुभन शेअर केला होता. सनी वेगवेगळ्या कामानिमित्त देशात ठिक ठिकाणी फिरत असते. मात्र तिला राजस्थानमध्ये आलेला अनुभव ती कधीच विसरु शकत नाही. सनी लिओनी खोलीत झोपली असताना तिला काही विचित्र अनुभव आल्याचे ती सांगते. एका मुलाखती दरम्यान सनीने सांगितले की, तिला स्लिप पॅरालिसस झाला होता. त्यावेळी झोपेतून उठताना तिला खूप जोर लावावा लागायचा. मात्र तिला सतत वाटायचे की तिला कोणीतरी पकडून ठेवले आहे. जेव्हा ही घटना तिसऱ्यांदा घडली तेव्हा ती संपूर्ण शक्तीनिशी उठली आणि जोरात ओरडली, ‘मला एकटीला सोडा’. सनी म्हणते की तिच्या या आरडण्यामुळे खरोखरच परिणाम झाला आणि त्यानंतर आरामात झोप मिळू लागली.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला सुद्धा एका हॉरर सिरीजच्या शूटिंग दरम्यान विचित्र घटना घडल्याचे सांगितले. ज्यामुळे तिला तिचे डोके देखील हलवता येत नव्हते. तो प्रोजेक्ट संपल्यानंतर तेथे काम करणाऱ्यांमधील १० लोक एकत्र आजारी पडल्याचे जान्हवीने एका पोस्टमध्ये उघड केले.
अशा घटना सर्वांसोबत कधीना कधी घडल्याच असतीस. पण हे सगळ खर आहे की भास? याचे उत्तर असे भयानक अनुभव येणाऱ्या कोणाकडेच नसते.