मुक्तपीठ टीम
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लस प्रभावी शस्त्र मानले जात आहे. मात्र, लसीकरण करणाऱ्या पालकांना टोचणी असते ती आपल्या मुलांचं काय, याची. आता मात्र पालकांनी दिलासा मिळणार आहे. कारण बंगळुरुच्या झायडस कॅडिलाने १२ वर्षांपुढील मुलांसाठीच्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
झायडसने औषध नियंत्रक महासंचालक कार्यालयाकडे म्हणजेच डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. डीसीजीआयकडून मंजूरी मिळाल्यानंतर लस बाजारात उपलब्ध होईल. लसीची तिसरी चाचणी पूर्ण झाली आहे.
१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच लस
- झायडस कॅडिला यांनी भारताच्या सर्वोच्च औषध नियामक, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे अर्ज केला आहे.
- झीकोव्ह-डी ची डीएनए लस तातडीने वापरण्यास मान्यता मिळावी.
- झायडस कॅडिलाची ही लस १२ वर्षांपुढील मुलांसाठी आहे.
- कंपनीने लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीचा डेटा सादर केला आहे.
- ज्यामध्ये २८,००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
- ही लस अंतरिम डेटामधील सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या मानकांवर आधारित आहे.
चाचणी काय सांगते?
- झायडस कॅडिलाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीची क्लिनिकल चाचणी डेटा सूचित करतो की झेकोव्ह-डी लस १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आहे. कोरोना लसीचे दरवर्षी १००-१२० दशलक्ष डोस तयार करण्याची कंपनीची योजना आहे.
- उल्लेखनीय आहे की कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा म्हणाले आहेत की झायडस कॅडिला लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे.
- जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टमध्ये, आम्ही ही लस १२-१८ वर्षांच्या मुलांना देऊ शकतो.