मुक्तपीठ टीम
कोरोना संकट काळातील आजवरची सर्वात मोठी बातमी आली आहे. झायडस कॅडिला या औषध कंपनीच्या विराफिन या औषधाला कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ म्हणजेच डीसीजीआयने मान्यता दिली आहे. या औषधामुळे मध्यम स्वरुपाचा कोरोना आठवडाभरात बरा होतो, असे चाचण्यांमध्ये आढळून आल्याचा दावा झायडस कॅडिलाने केला आहे.
पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा -2 बी म्हणजेच विराफिन या औषधासाठी झायडस कॅडिलाने नुकतीच डीसीजीआयकडे मान्यता मागितली होती. कोरोनाची मध्यम लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये या औषधाचा आपत्कालीन उपचारासाठी मान्यता मिळाली आहे.
एका आठवड्यात कोरोनावर मात करणारे औषध आहे तरी कसे?
• झायडस कॅडिलाने बनवलेले विराफिन हे औषध एका डोसचे औषध आहे
• ते कोरोना रूग्णांच्या उपचारांसाठी प्रभावी ठरेल.
• कोरोना झाल्यानंतर लवकर व्हिराफिन दिल्यास रूग्ण लवकरात लवकर बरे होतील.
• कंपनीने अशी माहिती दिली की, फेज ३ क्लिनिकल चाचण्यांमध्ये औषध दिल्यानंतर, कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे आढळले.
• चाचणी दरम्यान, बहुतेक रूग्णांची आरटी-पीसीआर अहवाल सात दिवसात निगेटिव्ह आले आहेत.
• हे औषध जलद गतीने विषाणूंना मारण्यासाठी मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे.
• हे औषध कोरोना रूग्णाला लवकरच दिल्यास ते त्यांच्या शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
• डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननंतर व्हिराफिन औषधे रुग्णालयात आणि केमिस्ट स्टोअर्समध्ये उपलब्ध होतील.