Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिऊताईचे घरटं बनवण्यास शिकवणारे झूम क्लासेस

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
zoom

मुक्तपीठ टीम

 

चिऊ ताई, चिऊ ताई दार उघड, ही कविता आपण सर्वांनीच ऐकली आहे. या कवितेतही चिऊ ताईचं छोटंसं घर होतं. पण आता चिऊ ताईसाठी खरंखुरं घरटं बनवण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. कारण, पुण्याचा लोक बिरादरी मित्रमंडळ ट्रस्ट आणि तासगावच्या मंगलमूर्ती सेवाभावी संस्थेनं आता झूमवर घरटं बनवण्याचे क्लास सुरु केले आहेत. ही खरंतर एक मस्त दोन तासांची ‘घर तिथे घरटं’ अॅक्टिविटी आहे.

आपल्या लाडक्या चिऊ ताईसाठी घरटं बनवायला येथे शिकवण्यात येणार आहे. कुणालाही अगदी नाममात्र शुल्कात ऊन-पावसांतही टिकेल असं चिऊताईचं मजबूत घरटं बांधायला शिकता येणार आहे. मंगलमूर्ती संस्थेने गेल्या ५ वर्षांत हजारो चिमण्यांना आणि पक्षांना जीवदान दिले आहे. तसेच त्यांच्यासाठी घरटी बनवली आहेत. या छोट्या अॅक्टिविटीच्या वर्कशॉपसाठी फक्त ५० रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. घरटे बनवण्यासाठी पुठ्ठा बॉक्स, सेलोटेप ब्राउन टेप प्लास्टिक पाईप, बॉक्स, कापूस, कात्री, गवत किंवा आंब्याच्या पेटीतील काड्या इत्यादी साहित्य आवश्यक आहे.

यंदाच्या पावसाळ्यातलं चिऊताईचं घरटं, किमान एक पावसाळा तरी नक्की टिकेल आणि वाहून न जाणारे असे बनवण्यास शिकवले जाईल. या ऑनलाइन उपक्रमात येथील निकम सर घरटं बनवायला शिकवणार आहेत त्याचबरोबर छानछान आणि सुंदर सुंदर गोष्टीही ते सांगणार आहेत. “घर तिथे घरटं” या कार्यशाळेची २ मेची बॅच संपूर्ण फुल झाली आहे. झूम सेशनच्या लिमिटमुळे त्यांना थांबावं लागत आहे. पुढील कार्यशाळा लवकरच भरवण्यात येईल. तुम्ही कार्यशाळेविषयी माहिती मिळवण्यासाठी लोकबिरादरीच्या ऐश्वर्या ७८७ ५५ ७१६७९ आणि शिल्पा ९६०७०५९२१३ यांच्याशी संपर्क साधा.

 

पाहा व्हिडीओ:

 


Tags: zoom classझूम सेशनमंगलमूर्ती संस्था
Previous Post

आदर्श घ्यावा असं कोरोना उपचारात ‘आत्मनिर्भर’ गाव

Next Post

लसीकरणाबद्दल अवघड वाटणारे प्रश्न आणि सोपी उत्तरं

Next Post
vaccination

लसीकरणाबद्दल अवघड वाटणारे प्रश्न आणि सोपी उत्तरं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!