Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर ‘झी’चं ‘सोनी’सोबत विलीनीकरण! ‘झी’ आणि ‘सोनी’चं नेमकं काय ठरलं?

September 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Zee-Sony

मुक्तपीठ टीम

गेली काही वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड (ZEEL) या कपंनीचा संकटमुक्तीचा मार्ग स्पष्ट झाला आहे. झीच्या संचालकमंडळाने मंजुरी दिल्यानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) आणि ‘झी’चे विलीनीकरण अधिकृत जाहीर झाले आहे. नव्या रचनेत ‘झी’चे पुनित गोयंकाच नव्या कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. नव्या कंपनीमध्ये सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा बहुसंख्य हिस्सा असेल. तर उरलेला ४७.०७ टक्के भाग झीकडे असेल. नवी कंपनी एक समूह म्हणून प्रेक्षक संख्येच्या बाबतीत स्टार समुहाला मागे टाकण्याची शक्यता आहे.

 

झी ग्रुपचे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका हे सोनी पिक्चर्समध्ये झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरणानंतरही त्यांच्या पदावर कायम राहतील. करारानुसार सोनी पिक्चर्स विलीनीकृत कंपनीमध्ये १.५७५ अब्ज डॉलर ची गुंतवणूक करेल. गुंतवलेले भांडवल व्यवसाय वाढीसाठी वापरले जाईल. नव्या कंपनीत झी एंटरटेनमेंटचे भागधारक ४७.०७ टक्के आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क ५२.९३ टक्के असतील.

punit goyanka

नव्या कंपनीतील हिस्सेदारी कशी असणार?

  • झी एंटरटेनमेंटच्या सोनीतील विलीनीकरणानंतर कंपन्यांमधील भागिदारी स्वरुपातही अनेक बदल होणार आहेत.
  • यानंतर ZEELच्या भागधारकांचा वाटा आहे त्या स्थितीत नव्या कंपनीत ६१.२५% असेल.
  • मात्र, सोनीद्वारे नियोजित १५७५ दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर भागभांडवलाची रचना बदलली जाईल.
  • या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे ४७.०७% असेल आणि सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा हिस्सा ५२.९३% असेल.

 

‘झी’ आणि ‘सोनी’चे काय ठरलं?

  • ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीट ठरवण्यात आली आहे. कराराची अंमलबजावणी पुढील ९० दिवसात पूर्ण केली जाईल.
  • विद्यमान प्रवर्तकांना म्हणजे झीला आपली हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुसंख्य संचालकांना नामांकित करण्याचा अधिकार सोनी समूहाकडे असेल.

Tags: punit goenkasonySPNIZEELझी एंटरटेनमेंटसीईओ पुनित गोयंकासोनी
Previous Post

“एसटीपीचे काम सुरळीत होण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधावी”: संजय बनसोडे

Next Post

“निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे”: रावसाहेब दानवे

Next Post
raosaheb danave

"निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे": रावसाहेब दानवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!