मुक्तपीठ टीम
निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. १० फेब्रुवारी २०२२ रोजी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीची सुरुवात होईल आणि ३ मार्च २०२२ रोजी उत्तर प्रदेशमध्ये ७ व्या टप्प्यासह समाप्त होईल. निवडणूक आयोगाने १० मार्च ही मतमोजणीची तारीख निश्चित केली आहे. या निवडणुकीत मताधिकार असलेल्या १८ कोटी ३४ लाख मतदारांमध्ये मोठ्या संख्येनं असलेल्या युवा मतदारांची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यांच्यातही पहिल्यांदाच मतदान करण्याची संधी लाभलेला नवयुवा वर्ग २५ लाखापर्यंत आहे.
२५ लाख नवीन मतदार प्रथमच देणार मत!
- या निवडणुकीत भाग घेणाऱ्या १८ कोटी ३४ लाख मतदारांमध्ये युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
- १८ ते ३५ वयोगटातील या युवा मतदारांमध्ये किमान २४ लाख ९० हजार हे पहिल्यांदाच मत देण्याचा अधिकार लाभलेले नवयुवा आहेत.
- पहिलेच मतदान असल्याने हा वर्ग उत्साहाने मतदान करण्यासाठी बाहेर येईल आणि इतरांनाही प्रेरित करेल, याची जास्त शक्यता आहे.
- मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ५ राज्यांच्या मतदार यादीत २४.९ लाख नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी ११.४ लाख नवतरुणी आहेत.
- सर्व पाच राज्यांमधील एकूण १८.३४ कोटी मतदार उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यामध्ये ८.५५ कोटी महिला मतदार आहेत.
निवडणूक आयुक्तांनी महिलांचे केले कौतुक
- मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी निवडणुकीत महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.
- ते म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांनी चोखपणे मतदान केले आहे. ते देशात समानतेला चालना देत आहे.
- निवडणुकीच्या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक मतदान केंद्र असेल, ते महिला कर्मचारी चालवतील.
- महिला मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात होणाऱ्या निवडणुकांचे वेळापत्रक
सर्व राज्यांचे निकाल – १० मार्च
१. पहिला टप्पा उत्तर प्रदेश
- अधिसूचना १४ जानेवारी
- नामांकनाची अंतिम तारीख २१ जानेवारी
- २४ जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची पडताळणी
- नामांकन २७ जानेवारी
- १० फेब्रुवारीला मतदान
२. दुसरा टप्पा उत्तर प्रदेश आणि पहिला टप्पा पंजाब, उत्तराखंड, गोवा
- अधिसूचना २१ जानेवारी
- नामांकनाची अंतिम तारीख २८ जानेवारी
- नामांकनांची पडताळणी २९ जानेवारी
- नामांकन ३१ जानेवारी
- १४ फेब्रुवारी रोजी मतदान
३. तिसरा टप्पा उत्तर प्रदेश
- अधिसूचना २५ जानेवारी
- नामांकनाची अंतिम तारीख १ फेब्रुवारी
- नामनिर्देशनपत्रांची पडताळणी २ फेब्रुवारी
- नामांकन ४ फेब्रुवारी
- २० फेब्रुवारी रोजी मतदान
४. चौथा टप्पा उत्तर प्रदेश
- अधिसूचना २७ जानेवारी
- नामांकनाची अंतिम तारीख ३ फेब्रुवारी
- नामनिर्देशनपत्रांची पडताळणी ४ फेब्रुवारी
- नामांकन ७ फेब्रुवारी
- २३ फेब्रुवारीला मतदान
५. उत्तर प्रदेश पाचवा टप्पा आणि मणिपूर पहिला टप्पा
- अधिसूचना १ फेब्रुवारी
- नामांकनाची अंतिम तारीख ८ फेब्रुवारी
- नामनिर्देशनपत्रांची पडताळणी ९ फेब्रुवारी
- नामांकन ११ फेब्रुवारी
- २७ फेब्रुवारीला मतदान
६. उत्तर प्रदेश सहावा टप्पा आणि मणिपूर दुसरा टप्पा
- अधिसूचना ४ फेब्रुवारी
- नामांकनाची अंतिम तारीख ११ फेब्रुवारी
- १४ फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्रांची पडताळणी
- नामांकन १६ फेब्रुवारी
- ३ मार्च रोजी मतदान
७. उत्तर प्रदेश सातवा टप्पा
- अधिसूचना १० फेब्रुवारी
- नामांकनाची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी
- नामनिर्देशनपत्रांची पडताळणी १८ फेब्रुवारी
- नामांकन २१ फेब्रुवारी
- ७ मार्चला मतदान