साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह एका तरुणाला पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. राजेश महेंद्र प्रताप असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते, अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाड येथील मालवणीतील राठोडी गावात अवैध गुटखा विक्री सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक डॉ. दिपक हिंडे यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी दिपक हिंडे, निजाई, भालेराव, नाडगौडा, बाबर यांनी राठोडी गावात छापा टाकून एका मिनी टेम्पोमध्ये ठेवलेला सुमारे साडेचार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यावेळी तिथे असलेल्या राजेशला पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशीत त्याने तो गुटखा तिथे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली, त्यामुळे त्याला या गुन्ह्यांत अटक करुन पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्याने तो गुटखा कोठून आणला, या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकारी आहेत का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.