Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता लेह-लडाखमध्ये बाइक रपेटीसाठी भाड्याने मिळणार येझदी बाइक्स!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Yezdi Bikes IN lEh LAdakh

मुक्तपीठ टीम

महिंद्रा अँड महिंद्राच्या क्लासिक लीजेंडच्या येझदी ब्रँडच्या बाइक्सचा आनंद आता लडाखमध्येही घेणं शक्य आहे. लडाखमध्ये लोक रॉयल एनफिल्ड बाईकला प्राधान्य देत आलेत. आतापर्यंत लेह लडाखमध्ये फक्त रॉयल एनफिल्ड बाइक्स भाड्याने मिळत होत्या. पण आता क्लासिक लीजेंड्सने लेह-लडाखमध्ये येझदीने मोटरसायकल भाड्याने देण्याची योजना आखली आहे.

क्लासिक लिजंडच्या या निर्णयामुळे आता या भागात रॉयल एनफिल्डच्या बाईकला टक्कर देणाऱ्या येझदी बाइक्सही लडाखमध्येही उपलब्ध होणार आहेत. येझदी रोडस्टर, स्क्रॅम्बलर आणि अॅडव्हेंचरचे तिन्ही मॉडेल्स भाड्याने उपलब्ध असतील.

क्लासिक लीजेंड्सने लेहमध्ये येझदी मोटरसायकलसाठी पूर्णवेळ सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे रॉयल एनफिल्डच्या अडचणी वाढणार आहेत, कारण आता लडाखमध्ये येझदी बाइक्सच्या प्रवेशानंतर रॉयल एनफिल्ड बाइक्सला स्पर्धा होईल. क्लासिक लीजेंडने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आता टूर आणि रेंटल ऑपरेटर्ससोबत सक्रियपणे भागीदारी करत आहेत. या मजबूत भागीदारीसाठी, कंपनी डिलिव्हरी ऑपरेटरना आपल्या ग्रँड जावा आणि येझदी या दोन बाइक्स पुरवत आहे. महिंद्राच्‍या मालकीची कंपनी क्‍लासिक लीजेंड जावा आणि येझदी ब्रँडच्‍या अनेक पॅावरफूल ऑफ-रोड बाईक बनवते, ज्या रॉयल एनफिल्‍डच्‍या हिमालयन आणि स्‍क्रम 411 मॉडेलला टक्कर देतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AdventureLEH LADAKHScramblerYEZDI BIKESYezdi Roadsterअॅडव्हेंचरयेझदी बाइक्सयेझदी रोडस्टरलेह-लडाखस्क्रॅम्बलर
Previous Post

कापड गिरणी उभारणारा द्रष्टा राजा, शाहू महाजारांना कापड जत्रेतून मानवंदना!

Next Post

ओएनजीसीत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या ९२२ जागांवर महाभरती

Next Post
ONGC

ओएनजीसीत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या ९२२ जागांवर महाभरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!